ढाका - बांगलादेश पुन्हा पाकिस्तानला मिळवण्यासाठी एक मोठं षडयंत्र सुरू असल्याचं समोर आले आहे. गुरुवारी भारतानेबांगलादेशातील राजशाही आणि खुलना शहरातील व्हिसा केंद्र बंद केली आहेत. याठिकाणी मोहम्मद युनूस सरकारच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीने भारताच्या उच्चायुक्त कार्यालयाबाहेर मोठं आंदोलन केले. या आंदोलनानंतर आता बांगलादेशात हिंसाचार आणि जाळपोळ सुरू झाली आहे. आंदोलनातील उस्मान हादी या आंदोलकाच्या मृत्यूनंतर कंटरपंथींनी भारताचं नाव घेत खोटा आरोप करणे सुरू केले आहे.
ढाका इथं ISI सक्रीय, पाकिस्तानला काय हवं?
एका रिपोर्टनुसार, बांगलादेशात पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ची सक्रीयता वाढली आहे. मागील महिन्यातच पाकिस्तानी संयुक्त चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे चेअरमन जनरल साहीर शमजाद मिर्झा यांनी ढाका दौरा केला होता. त्यावेळी बांगलादेशने पाकिस्तानला बांगलादेशात त्यांच्या उच्चायुक्तांना गुप्तचर अधिकारी नेमण्याची परवानगी दिली आहे. जे ISI साठी महत्त्वाचं पाऊल होते.
पाकिस्तान बांगलादेशात गुप्तहेर एक्टिव्ह
भारतातील रणनीती विश्लेषक ब्रह्मा चेलानी म्हणाले की, मागील वर्षी ढाका येथे सत्ता परिवर्तन झाल्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात पडद्याआड संरक्षण आणि गुप्तहेर सहकार्य वाढवण्यात आले आहे. आयएसआय आणि डीजीएफआयच्या संयुक्त गुप्तचर ऑपरेशनमध्ये सक्रीय आयएसआय सेल सहभागी आहे. दोन्ही बाजूने सुरक्षेशी निगडीत हालचाली सुरू आहेत. बंगालच्या उपसागरावरील आणि भारताच्या पूर्वेकडील सीमेवरील हवाई क्षेत्राचे निरीक्षण करण्यासाठी संयुक्त गुप्तचर माहिती सामायिकरण आणि सहकार्य चौकट स्थापन करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शविली. या घटना बांगलादेश आणि पाकिस्तानमधील वाढत्या जवळकीचे संकेत देतात. तर संयुक्त लष्करी सराव, प्रशिक्षण आणि क्षमता-निर्मिती उपक्रमांचा विचार करण्याच्या त्यांच्या निर्णयातून दोन्ही देशांच्या लष्करी-स्तरीय संबंधांमध्ये मोठा बदल दिसून येतो.
दरम्यान, बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस भारताविरोधी विधाने करत आहेत. बांगलादेशात जे घडले त्यात बाहेरील शक्तींचा हात होता. हे पाकिस्तानच्या माध्यमातून करण्यात आले होते. बांगलादेशात पाकिस्तानातील सर्वात मोठे माध्यम जमात ए इस्लामी आहे. ही संघटना पाकिस्तानच्या इशाऱ्यावर नाचत असते. आयएसआय भारताचं बांगलादेशावरील नियंत्रण आणि तेथील बाहुली सरकार हटवायचे होते त्यासाठी जमात ए इस्लामीला बांगलादेशाची सत्ता आणण्यासाठी मदत करत आहे. पाकिस्तानी लष्कराकडून आर्थिक रसदही पुरवली जात आहे असंही काही विश्लेषक सांगतात.
Web Summary : Bangladesh faces unrest amid ISI activity, allegedly fueled by Pakistan. Protests and violence escalate, with accusations against India. Increased Pakistani influence and covert cooperation raise concerns.
Web Summary : बांग्लादेश में ISI की सक्रियता से अशांति, पाकिस्तान पर आरोप। विरोध और हिंसा बढ़ी, भारत पर आरोप लगे। पाकिस्तानी प्रभाव और गुप्त सहयोग बढ़ने से चिंता।