शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
4
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
5
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
6
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
7
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
8
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
9
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
10
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
11
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
12
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
13
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
14
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
16
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
17
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
18
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
19
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
20
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!

Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 14:09 IST

ChatGPT: चॅटजीपीटी बनवणाऱ्या ओपनएआय कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत.

चॅटजीपीटी बनवणाऱ्या ओपनएआय कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत. कॅलिफोर्नियामधील एका १६ वर्षीय मुलाने चॅटजीपीटीच्या सूचनांमुळे आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप त्याच्या पालकांनी केला. याप्रकरणी, मुलाच्या पालकांनी कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे, ज्यामुळे जनरेटिव्ह एआयच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

कॅलिफोर्निया येथील १६ वर्षीय अॅडम रेनने एआय चॅटबॉट वापरून आत्महत्या केली, असा आरोप त्याचे पालक मॅट आणि मारिया रेन यांनी केला असून त्यांनी ओपनएआय विरुद्ध ४० पानांचा खटला दाखल केला आहे. पालकांच्या म्हणण्यांनुसार, अॅडम गृहपाठासाठी चॅटजीपीटीचा वापर करायचा. मात्र, त्यानंतर एआय टूलने त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले. १०० टक्के खात्री आहे की, चॅटजीपीटीनेच त्याला आत्महत्या करण्यास मदत केली.  चॅटजीपीटीने त्याला आत्महत्येबद्दल विचारण्यापासून रोखले नाही किंवा आपत्कालीन प्रोटोकॉल सुरू केला नाही, असाही पालकाचा आरोप आहे.

ओपनएआयचे स्पष्टीकरण

या घटनेवर ओपनएआयने स्पष्टीकरण दिले. चॅटजीपीटीमधील त्रुटी दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने सतत सुधारणा केली जात आहे, जेणेकरून लोकांचे संरक्षण करता येईल, अशी माहिती त्यांनी एका ब्लॉग पोस्टद्वारे दिली.

एएआय धोकादायक?

एआयच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही .'एआयचे गॉडफादर' म्हणून ओळखले जाणारे जेफ्री हिंटन यांनीही टेक कंपन्यांच्या एआयच्या एकत्रीकरणावर चिंता व्यक्त केली होती. तंत्रज्ञान कंपन्यांना एआयला मानवांवर वर्चस्व मिळवायचे आहे. जर असे झाले तर येत्या काही वर्षांत एआय आपल्यासाठी मोठा धोका बनेल, असे त्या म्हणाल्या होत्या.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानCrime Newsगुन्हेगारी