शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नेतान्याहू यांचा मृत्यू की जिवंत? इस्रायली राजदूतांचा खळबळजनक खुलासा;'सहा बोटां'च्या मिस्ट्रीवरही पडदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 15:35 IST

इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनीही या प्रकरणावर स्पष्ट विधान केले. "पंतप्रधान नेतन्याहू जिवंत आहेत. मी त्यांना अनेक वेळा प्रत्यक्ष पाहिले आहे, असेही अझर म्हणाले. अझर यांनी कॅफेचा व्हिडीओ खरा असल्याची पुष्टी केली.

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. व्हायरल होणारे व्हिडीओ AI निर्मित असल्याचा दावा केला जात असतानाच, आता भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी या प्रकरणावर मोठे विधान केले आहे.

नेतन्याहूंना जिवंत दाखविण्यासाठी जो व्हिडीओ इस्रायलने जारी केला, तो ही निघाला डीपफेक...; Grok म्हणतोय...

काय आहे 'सहा बोटां'ची मिस्ट्री?

नेतान्याहू यांच्या निधनाच्या अफवांना तेव्हा उधाण आले, जेव्हा त्यांच्या एका जुन्या व्हिडिओमध्ये त्यांच्या हाताला सहा बोटे दिसत असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला. "ही एआयची चूक असून नेतान्याहू आता जिवंत नाहीत," असा दावा सोशल मीडियावर केला जात होता.

राजदूत रुवेन अझर यांचा दावा

या सर्व अफवांचे खंडन करताना राजदूत रुवेन अझर म्हणाले, "पंतप्रधान नेतान्याहू जिवंत आणि सक्रिय आहेत. मी त्यांना अनेकदा प्रत्यक्ष पाहिले आहे." त्यांनी जेरुसलेममधील कॅफेमधील व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी केली असून, नेतान्याहू पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट केले आहे.

नेतान्याहू यांनीच उडवली अफवांची खिल्ली!

स्वतः नेतान्याहू यांनी जेरुसलेममधील 'द सताफ' कॅफेमधून एक व्हिडिओ पोस्ट करत अफवा पसरवणाऱ्यांना चपराक दिली आहे. हातात कॉफीचा कप घेऊन कॅमेऱ्याकडे पाहत त्यांनी हसत विचारले, "ते काय म्हणतात मी? पहा!" इतकेच नाही तर त्यांनी आपले दोन्ही हात वर करून पाच बोटे दाखवली आणि 'सहा बोटां'च्या दाव्यातील हवा काढून टाकली.

गेल्या दोन दिवसांपासून नेतन्याहू यांचा इराणच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा इराण समर्थक सोशल मीडिया हँडलवरून केला जात होता. या अफवा शांत करण्यासाठी नेतन्याहू यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला, ज्यामध्ये ते एका कॅफेमध्ये कॉफी पिताना दिसत आहेत. मात्र, व्हिडिओच्या एका विशिष्ट फ्रेममध्ये  नेतन्याहू यांच्या ओठांची हालचाल आणि आजुबाजुच्या गोष्टी, कपमधील कॉफीचा जास्तीचा स्तर आदी बनावट असल्याचा दावा 'Frame-by-Frame' विश्लेषण करणाऱ्या युजर्सनी केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Netanyahu Alive? Israeli Envoy Clarifies; Six-Finger Mystery Resolved

Web Summary : Rumors of Netanyahu's death spread online, fueled by a 'six-finger' video. Israel's envoy refuted claims, confirming Netanyahu is alive and well. Netanyahu himself dismissed the rumors with a video, showing his hands and enjoying coffee.
टॅग्स :Israelइस्रायलUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर