शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जगात आणखी एका युद्धाची घंटा? किम जोंग यांची दक्षिण कोरियावर हल्ला करण्याची योजना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 14:41 IST

Kim Jong Un : किम जोंग उन यांनी स्पष्ट केले होते की, उत्तर कोरियाला युद्धाची इच्छा नाही, पण त्यापासून मागे हटणार नाही. युद्ध सुरू झाल्यावर दक्षिण कोरिया ताब्यात घेणे हे आपले ध्येय आहे.

Kim Jong Un : (Marathi News) युक्रेन-रशिया युद्ध आणि गाझामधील इस्रायल-हमास संघर्षादरम्यान आता जगाचे लक्ष उत्तर कोरियाकडे लागले आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्या अलीकडील हालचालींमुळे त्यांच्या लष्करी महत्त्वाकांक्षेवर एक नवीन वादविवाद सुरू झाला आहे, ज्यामध्ये त्यांनी दक्षिण कोरियाशी समेट किंवा पुन्हा एकत्र येण्याबद्दलच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. 

केसीएनएच्या रिपोर्टनुसार, नुकत्याच झालेल्या एका राजकीय कार्यक्रमात किम जोंग उन यांनी स्पष्ट केले होते की, उत्तर कोरियाला युद्धाची इच्छा नाही, पण त्यापासून मागे हटणार नाही. युद्ध सुरू झाल्यावर दक्षिण कोरिया ताब्यात घेणे हे आपले ध्येय आहे. उत्तर कोरियाच्या अलीकडील अत्याधुनिक आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे किम जोंग उन यांच्या राजकीय आणि लष्करी महत्त्वाकांक्षांना बळ मिळाले आहे. किम जोंग उन सातत्याने आपली लष्करी शक्ती वाढवत आहे. किम जोंग उन यांच्या धोकादायक योजनांबाबत आंतरराष्ट्रीय समुदाय तणावात आहे.

सांगजी विद्यापीठातील लष्करी अभ्यासाचे प्राध्यापक चोई गि-इल यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात आता युद्ध होण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाने भविष्यात कोणतेही प्रक्षोभक कृत्य केल्यास मोठ्या प्रमाणात नागरिक आणि लष्करी जवानांचे बळी जाऊ शकतात. अशा स्थितीत दक्षिण कोरिया हवाई हल्ले करू शकतो. दरम्यान, दक्षिण कोरिया आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील संघर्षामुळे किम जोंग उन यांना आपल्या राजवटीला असलेल्या अस्तित्वाच्या धोक्याची जाणीव आहे. याशिवाय, ते थेट युद्धात न जाता तणाव वाढवण्याच्या तयारीचे संकेत देत आहे, असे काही लोकांचे म्हणणे आहे. क्यूंगनाम विद्यापीठाच्या सुदूर पूर्व अभ्यास संस्थेच्या युल-चुल लिम यांच्या मते, तणावपूर्ण वातावरणामुळे गैरसमज आणि अपघाती संघर्ष होण्याची शक्यता जास्त आहे.

किम जोंग उन यांनी दिला होता 'हा' इशारा नुकतेच, जमिनीवरून समुद्रात मारा करणाऱ्या नवीन क्षेपणास्त्राच्या चाचणीच्या वेळी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी असा इशारा दिला की, त्यांचा देश प्रतिस्पर्धी दक्षिण कोरियासोबतच्या विवादित सागरी सीमांवर अधिक आक्रमक लष्करी भूमिका घेईल. 

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनSouth Koreaदक्षिण कोरियाnorth koreaउत्तर कोरिया