शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Russia vs Ukraine War: भारतासमोर मोठे धर्मसंकट! युएनमध्ये आज मतदान केले, नाही केले तरी रशियाविरोधातच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 11:32 IST

UNGA Proposal Against Russia On Ukraine Issue : भारताने मतदान न केल्यास रशियाला अप्रत्यक्ष विरोध होईल, ज्यामुळे अनेक दशकांच्या मैत्रीला तडा जाण्याची भीती आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून चारवेळा युएनमध्ये विविध मतदानांवर भारताने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. परंतू आज भारतासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. 

युक्रेनवर हल्ला केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेतून रशियाला निलंबित करण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) आज गुरुवारी मतदान केले जाणार आहे. या प्रस्तावावर भारताने तटस्थ राहण्य़ाची भूमिका घेत मतदान नाही केले तरी ते रशियासाठी नुकसानीचे ठरणार आहे. आणि जरी केले तरी भारत रशियाच्या नरसंहाराच्या बाजुने मतदान करू शकणार नाही. अशा मोठ्या पेचात भारत अडकला आहे. यामुळे भारत कोणती भूमिका घेतो यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या न्यायमूर्तींनी रशियाविरोधात मतदान केले होते. रशियाने युक्रेनवरील आक्रमण थांबवावे, या बाजुने निकाल आला होता. कारण मोजकेच न्यायाधीश सुनावणीनंतर मतदान करणार होते. यामुळे भारताला न्याय देवतेच्या विरोधात वेगळी भूमिका घेण्याची संधी नव्हती. परंतू आज युएनमध्ये भारताला मतदान करावेच लागणार आहे. 

भारताने पूर्वीप्रमाणे यावेळीही मतदानात भाग घेतला नाही, तर रशियाविरुद्ध पाश्चात्य देशांचे हात बळकट होतील, तर याआधी मतदानातून माघार घेतल्याने रशियाला मदत मिळत होती. रशियाच्या बाजुने चीन, पाकिस्तान आदी मोजकेच देश मतदान करतात. अशावेळी ४७ सदस्यांच्या परिषदेत भारताने मतदान केले काय आणि नाही केले काय अमेरिकेचेच फावणार आहे. यामुळे रशिया कायमचा परिषदेतून बाहेर जाणार आहे. 

भारताने मतदान न केल्यास रशियाला अप्रत्यक्ष विरोध होईल, ज्यामुळे अनेक दशकांच्या मैत्रीला तडा जाण्याची भीती आहे. भारताने रशियाच्या बाजूने मतदान केले तर अलिप्ततेच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि पाश्चिमात्य देशांना बोट दाखवण्याची संधी मिळेल. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ठराव मंजूर होण्यासाठी एकूण मतदानाच्या दोन तृतियांश मतदान लागणार आहे. अशा परिस्थितीत, संयुक्त राष्ट्रातील रशियाच्या दूतावासाने सदस्य देशांना चेतावणी दिली आहे की, मतदानात सहभाग न घेतल्यास तो रशियाचा विरोध मानला जाईल आणि मैत्रीवर त्याचे परिणाम होतील. यामुळे भारताने काय करावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाIndiaभारत