शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

37 हजार फूट उंचीवर दोन पायलट्स भिडले; प्रवाशांचा जीव टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 15:40 IST

एअरलाईन्सकडून दोन्ही वैमानिकांचं निलंबन

बगदाद : विमान तब्बल 37 हजार फूट उंचीवर असताना फ्री स्टाईल हाणामारी करणाऱ्या दोन वैमानिकांना इराकी एअरवेजनं निलंबित केलं आहे. इराणहून इराकला जाणाऱ्या विमानाच्या दोन वैमानिकांमध्ये जुंपली होती. या विमानात 157 प्रवासी होते. वैमानिकांच्या हाणामारीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात होता. मात्र या प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.विमानात झालेल्या हाणामारीबद्दल एका सहवैमानिकानं इराकी एअरवेजच्या व्यवस्थापनाला पत्र लिहिलं आहे. 'एअर हॉस्टेस माझ्यासाठी जेवण आणत होती. मात्र वैमानिकानं तिला जेवणाचा ट्रे आणू दिला नाही. त्यामुळे वैमानिकासोबतचा वाद वाढला. वैमानिकानं तिला जेवण आणण्याची परवानगी नाकारल्यानं हा संपूर्ण प्रकार घडला,' असं वैमानिकानं व्यवस्थापनाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. जेवण झाल्यावर वैमानिकानं मला धक्का दिला आणि अपमानित केलं, असंदेखील सहवैमानिकानं पत्रात म्हटलं आहे. यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. विमान सुरक्षितरित्या बगदादमध्ये पोहोचलं. मात्र लँडिंगनंतरही वैमानिकांमधील भांडण सुरूच होतं. एअरवेजच्या व्यवस्थापनाला लिहिलेल्या पत्रात सहवैमानिकानं त्याची व्यथा मांडली. 'वैमानिकानं मला दोनदा मारलं आणि अपमानित केलं. त्यानंतर मी त्याला प्रत्युत्तर दिलं. कारण मला स्वत:चं रक्षण करायचं होतं,' असं सहवैमानिकानं पत्रात नमूद केलं आहे. सध्या इराकी एअरवेजच्या व्यवस्थापनाकडून दोन्ही वैमानिकांच्या दाव्यांची पडताळणी सुरू आहे. या दोघांवर आजीवन बंदी घातली जाऊ शकते, असं व्यवस्थापनानं म्हटलं आहे.  

टॅग्स :pilotवैमानिकIranइराणInternationalआंतरराष्ट्रीय