शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात; इराकच्या कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

By कुणाल गवाणकर | Updated: January 7, 2021 21:22 IST

समर्थकांनी अमेरिकन संसदेवर हल्ला केल्यानं अडचणीत आलेल्या ट्रम्प यांचा पाय आणखी खोलात

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या संसदेवर झालेल्या हल्ल्यामुळे अडचणीत आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेवर हल्ला केल्यानं अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यातच आता इराकमधील न्यायालयानं ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट काढलं आहे. इराणचे जनरल आणि एका प्रभावशाली इराकी मिलिशिया नेत्याला ठार मारल्याप्रकरणी अटक वॉरंट काढण्यात आलं आहे. याआधी इराणनंदेखली ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. इराणनं ट्रम्प यांच्या अटकेसाठी इंटरपोलचीदेखील मदत मागितली आहे.अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात जनरल कासिम सुलेमानी आणि अबु माहदी अल मुहंदिस मारले गेले. या प्रकरणात बगदादच्या न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी वॉरंट जारी केल्याची माहिती इराकी न्यायालयाच्या माध्यम कार्यालयानं दिली. सुलेमानी आणि मुहंदिस गेल्या वर्षी बगदाद विमानतळाबाहेर ड्रोन हल्ल्यात मारले गेले. त्यानंतर अमेरिका आणि इराकमधील संबंध ताणले गेले.इराणनं त्यांच्या सर्वात वरिष्ठ जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येच्या एका वर्षानंतर आंतरराष्ट्रीय संस्था इंटरपोलकडे ट्रम्प यांच्या अटकेसाठी मदतीची मागणी केली आहे. ट्रम्प यांच्यासह अमेरिकच्या ४७ अधिकाऱ्यांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याचं आवाहन इराणनं इंटरपोलकडे केलं आहे. इराणनं याआधी जूनमध्ये इंटरपोलकडे रेड कॉर्नरची नोटीस जारी करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र तेव्हा इंटरपोलनं त्यांची मागणी फेटाळली होती.रेव्हॉल्युशनरी गार्डचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष आणि पेंटॉगॉनचे कमांडर यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी व्हायला हवी, अशी मागणी इराणचे न्याय विभागाचे प्रवक्ते गुलाम हुसेन इस्माइली यांनी केली. आम्ही यासाठी इंटरपोलकडे आवाहन केलं आहे. आमच्या कमांडरच्या हत्येसाठी जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी आणि याबद्दल आम्ही अतिशय गंभीर आहोत, असं इस्माइली पुढे म्हणाले. इराणनं या प्रकरणात आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १ हजार पानांचं आरोपपत्र तयार करण्यात आलं आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIranइराण