शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलच्या अण्वस्त्र केंद्रावर इराणची वक्रदृष्टी; तेहरानमधून आली आतापर्यंतची सर्वात मोठी धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 12:19 IST

कतारमध्ये अमेरिकन एअरबेस उडवण्यासाठी गेलेले इराणचे दोन Su-24 बॉम्बर्स कतारच्या हवाई दलाने पाडल्यापासून इराण चवताळला आहे.

मध्यपूर्वेतील रणसंग्राम आता एका अशा वळणावर पोहोचला आहे, जिथून संपूर्ण जगाचा विनाश होऊ शकतो. इराणमध्ये सत्तापालट करण्याचे प्रयत्न अमेरिका आणि इस्रायलने केल्यास, इस्रायलचे सर्वात मोठे अण्वस्त्र केंद्र उडवून देण्याची उघड धमकी इराणने दिली आहे. "आमच्या देशाच्या अंतर्गत विषयात ढवळाढवळ केली किंवा शासन बदलण्याचा प्रयत्न केला, तर इस्रायलला अण्वस्त्रांच्या ढिगाऱ्यावर बसवू," अशा शब्दात तेहरानने जगाला इशारा दिला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

कतारमधील घटनेनंतर इराणचा पारा चढला!

कतारमध्ये अमेरिकन एअरबेस उडवण्यासाठी गेलेले इराणचे दोन Su-24 बॉम्बर्स कतारच्या हवाई दलाने पाडल्यापासून इराण चवताळला आहे. या घटनेनंतर इराणने आपली रणनीती बदलली असून, आता त्यांनी थेट इस्रायलच्या 'डिमोना'सारख्या संवेदनशील अणू केंद्रांना लक्ष्य करण्याची तयारी दर्शवली आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने स्पष्ट केले आहे की, त्यांची क्षेपणास्त्रे आता इस्रायलच्या अण्वस्त्र निर्मिती केंद्रांच्या पिन-पॉईंट लोकेशनवर तैनात आहेत.

कतारमध्ये नेमकं काय झालं होतं?

इराणने अमेरिकेच्या अल-उदीद एअरबेसवर हल्ला करण्यासाठी दोन महाविनाशक सोव्हिएत बनावटीची विमाने पाठवली होती. रडारच्या नजरेतून वाचण्यासाठी ही विमाने समुद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या ८० फूट उंचीवरून उडत होती. मात्र, कतारच्या 'एफ १५' फायटर जेट्सनी केवळ २ मिनिटे उरली असताना या विमानांना आकाशातच संपवले. या कारवाईमुळे इराणचा मोठा डाव फसला असून, आता त्यांनी आपला मोर्चा इस्रायलच्या अणू केंद्रांकडे वळवला आहे.

४०० क्षेपणास्त्रे आणि १,००० ड्रोन्सचा मारा!

युद्धाच्या सुरुवातीपासून इराणने आतापर्यंत खाडी देशांच्या दिशेने ४०० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि १,००० हून अधिक ड्रोन डागले आहेत. जरी अनेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आली असली, तरी कुवेतमध्ये झालेल्या एका हल्ल्यात ६ अमेरिकन सैनिकांचा बळी गेला आहे. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अमेरिका आणि इस्रायलची चिंता वाढली आहे.

इस्रायलला संपवण्याचा डेडलाईन प्लॅन?

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने कतारच्या कारवाईला 'युद्ध भडकवणारी कृती' म्हटले असून, आता थेट इस्रायलला इशारा दिला आहे. "इस्रायलकडे असलेले अणुबॉम्ब ज्या कारखान्यात तयार होतात, ते ठिकाण आमच्या एका बटणाच्या अंतरावर आहे," अशी इराणची धमकी म्हणजे जागतिक शांततेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

इराणच्या या प्रक्षोभक विधानावर आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिका काय प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. जर अण्वस्त्र केंद्रांवर हल्ला झाला, तर त्याचे परिणाम केवळ मध्यपूर्वेपुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगाला भोगावे लागतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Threatens Israel's Nuclear Facility Amid Escalating Middle East Tensions.

Web Summary : Iran warned it would destroy Israel's nuclear facility if the US and Israel attempt regime change. This threat follows the downing of Iranian bombers by Qatar and increased aggression, including missile strikes, raising fears of wider conflict.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाWarयुद्ध