शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 09:33 IST

Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी युद्धाची घोषणा केली आहे.

Israel Iran War: इस्रायल आणि इराणमधील युद्ध दिवसेंदिवस धोकादायक होत चाललं आहे. गेल्या ६ दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात, इस्रायल सातत्याने इराणच्या अणु आणि तेल प्रकल्पांना लक्ष्य करताना दिसत आहे. प्रत्युत्तरामध्ये इराण देखील इस्रायलवर सतत क्षेपणास्त्रे डागत आहेत. अशातच इराणने इस्रायलविरुद्ध अखेर युद्ध पुकारले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी बुधवारी एक्स पोस्ट करत युद्धाची घोषणा केली आहे. अयातुल्ला अली खामेनी यांनी आपले अधिकार इराणी सैन्याकडे सोपवले आहेत.

इराण आणि इस्रायलमधील युद्ध थांबताना दिसत नाहीये. आता अमेरिकेनेही उघडपणे युद्धभूमीत उतरण्याची तयारी दर्शविली आहे. अशातच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अधिकृतपणे युद्धाची घोषणा केली आहे. खामेनी यांनी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सला महत्त्वाच्या अधिकार सोपवले आहेत. खामेनी यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह ईशान्य तेहरानमधील एका भूमिगत बंकरमध्ये हलवण्यात आल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

अयातुल्ला अली खामेनी यांनी आधी "महान हैदरच्या नावाने, युद्ध सुरू झाले आहे," अशी पोस्ट केली. त्यानंतर काही वेळातच, खामेनींनी इस्रायलला इशारा देत, "आता दहशतवादी झिओनिस्ट राजवटीला कडक प्रत्युत्तर दिले पाहिजे. आम्ही त्यांच्याबाबतीत आता कोणतीही दया दाखवणार नाही," असं म्हटलं. या घोषणेनंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली.

या आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. "इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी कुठे लपले आहेत हे आम्हाला माहिती आहे. पण सध्या तरी त्यांना ठार मारायची इच्छा नाही," असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. तसेच , इराणमध्ये नागरी वस्त्यांवर आम्हाला हल्ले करायची इच्छा नाही. मात्र आमचा संयम आता संपत चालला आहे, ही गोष्टही खरी आहे. इराणने अणुकरार करणे आवश्यक होते. त्यांना तशी विनंतीही मी केली होती. मात्र इराणने ते मान्य केले नाही. आता चर्चा करावी असे वाटत नाही, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू