शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 10:38 IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतरही इराणचे इस्रायलवरील हल्ले सुरुच आहेत.

Ayatollah Ali Khamenei on Iran Israel Ceasefire: इराण आणि इस्रायलमध्ये गेल्या १२ दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धाबाबात मोठी घडामोड समोर आली. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध संपल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. मात्र इराणने हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी प्रतिक्रिया दिली. इराण हे शरणागती पत्करणारे राष्ट्र नाही असं खामेनी यांनी म्हटलं आहे. दरम्यान ट्रम्प यांनी यु्द्धबंदीची घोषणा करताच इराणने इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागली.

इराण आणि इस्रायलमधील युद्ध आता एका नवीन वळणावर येऊन पोहोचलं आहे. इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील युद्धबंदीची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स पोस्टमधून युद्धविरामाची घोषणा केली. सर्वांना अभिनंदन! इस्रायल आणि इराणमध्ये एक करार झाला आहे की ६ तासांच्या आत संपूर्ण  युद्धबंदी लागू होईल. इराण पहिल्या १२ तासांसाठी युद्धबंदी पाळेल, त्यानंतर इस्रायल. २४ तासांनंतर, हे युद्ध संपल्याचे मानले जाईल, असं ट्रम्प यांनी म्हटलं. मात्र इराणने हा प्रस्ताव नाकारल्याचे  दिसत आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे एक मोठे विधान समोर आले आहे. "ज्यांना इराणी लोक आणि त्यांचा इतिहास माहित आहे त्यांना माहिती असेलच की इराणी राष्ट्र शरणागती पत्करणारा देश नाही," असं खामेनी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं.

दरम्यान, ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर, इराणने इस्रायलवर ६ वेळा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. एक क्षेपणास्त्र बेरशेबा शहरातील एका इमारतीवर पडले. या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्याआधी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इस्रायलसोबत युद्धबंदीच्या वृत्ताला नकार दिला होता. "इस्रायलसोबत अद्याप कोणताही अंतिम युद्धबंदी करार झालेला नाही. जर इस्रायलने हल्ले थांबवले तर इराणही हल्ला करणार नाही," असं अब्बास अराघची म्हणाले.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू