वॉश्गिंटन - अमेरिका आणि इस्रायलचाइराणवर संयुक्त हल्ला सुरूच आहे. इराणही सातत्याने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. त्यातच अमेरिकेने इराणविरुद्ध सैन्य कारवाई आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. आज रात्री इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होणार अशी धमकीच अमेरिकेचे ट्रेजरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी दिली आहे.
एका कार्यक्रमात स्कॉट बेसेंट म्हणाले की, जसे सेक्रेटरी हेगसेथ, जनरल केन आणि राष्ट्रपतींनी म्हटल्याप्रमाणे आज रात्री आमची सर्वात मोठी बॉम्बहल्ला मोहीम असेल आणि आम्ही इराणी क्षेपणास्त्र लॉन्चर आणि क्षेपणास्त्र उत्पादक कारखान्यांना सर्वात जास्त नुकसान पोहोचवू. अमेरिकन सैन्य इराणच्या क्षमतांमध्ये लक्षणीय घट करत आहे. इराण दोन मोर्चांवर लढत आहे आणि तिथे अमेरिकेची मोहीम खूप प्रभावी ठरली आहे. आम्ही खूप प्रमाणात इराणला कमकुवत केले आहे. आमची मोहीम जबरदस्त सुरू आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कच्चे तेल खरेदीसाठी भारताला सूट
इराणसोबत वाढत्या युद्धात जागतिक तेल बाजार संतुलित ठेवण्यासाठी अमेरिकेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारताला रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची सूट दिली आहे. रशियाच्या तेल खरेदीवर लावलेले निर्बंध अमेरिका हटवू शकते. निर्बंध लावलेल्या कच्च्या तेलाचे कोट्यवधी बॅरेल पाण्यावर आहेत आणि त्यावर बंदी न आणता पुरवठा करण्यावर आम्ही विचार करत आहोत असंही अमेरिकेने सांगितले.
इराणला कसा नेता हवा, ट्रम्प यांनी सांगितले
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांच्या हातात इराणची सूत्रे गेली आहे. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्षेप घेतला. इराणचा नेता लोकशाहीवादी असावा हे गरजेचे नाही, कुठल्याही धार्मिक नेत्याच्या हाती सत्ता राहिली तरी त्याबाबत हरकत नाही असं ट्रम्प यांनी स्पष्ट केले. इराणमध्ये निष्पक्ष आणि न्यायपूर्ण वागेल असा नेता महत्त्वाचा आहे. तो व्यक्ती कोण यावर निर्भर करते. मला धार्मिक नेत्यांची समस्या नाही. मी अनेक धार्मिक नेत्यांसोबत काम करतो. जो चांगले काम करेल आणि अमेरिका इस्रायलसोबत चांगले संबंध ठेवेल असा नेता हवा असंही ट्रम्प यांनी म्हटलं.
Web Summary : The US threatens a major strike on Iran, targeting missile facilities. India receives a 30-day waiver for Russian oil purchases. Trump suggests Iran needs a fair leader, regardless of religious affiliation, who fosters good relations with the US and Israel.
Web Summary : अमेरिका ने ईरान पर मिसाइल ठिकानों को निशाना बनाते हुए बड़े हमले की धमकी दी है। भारत को रूसी तेल खरीद पर 30 दिन की छूट मिली है। ट्रंप ने कहा ईरान को एक निष्पक्ष नेता की जरूरत है, चाहे वह धार्मिक हो, जो अमेरिका और इजरायल के साथ अच्छे संबंध बनाए।