शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 05:44 IST

Iran US war live 2-week ceasefire: पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांत शुक्रवारपासून चर्चेला सुरुवात होणार

Iran US war live 2-week ceasefire: अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भूमिकेत अचानक बदल केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्यापुरती लष्करी कारवाई थांबवण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे राजकीय वाटाघाटींचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. 'ट्रुथ सोशल'वरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले आहे की, मी दोन आठवड्यांसाठी इराणवरील बॉम्बहल्ले आणि इतर आक्रमणे स्थगित करण्यास सहमत आहे आणि याला त्यांनी सर्वसमावेशक युद्धविरामाच्या दिशेने एक पाऊल म्हटले आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये या दोन्ही देशांमध्ये शुक्रवारपासून चर्चेला सुरुवात होणार आहे.

त्यांनी सांगितले आहे की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानने ट्रम्प यांना नियोजित हल्ले पुढे ढकलण्याची विनंती केली होती. ट्रम्प यांनी हे देखील स्पष्ट केले की, ही स्थगिती इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याच्या अटीवर आहे. तणाव कमी करण्यासाठी हे एक आवश्यक पाऊल आहे.

ट्रम्प यांनी लिहिले, "हा द्विपक्षीय युद्धविराम असेल. याचा अर्थ दोन्ही बाजूंनी या दोन आठवड्यांच्या कालावधीत सैन्य मागे घेणे अपेक्षित आहे. ट्रम्प यांनी असाही दावा केला की लष्करी उद्दिष्टे आधीच साध्य झाली आहेत आणि तेहरानसोबतची वाटाघाटी निर्णायक टप्प्याच्या जवळ पोहोचली आहेत. आम्ही आमची सर्व लष्करी उद्दिष्ट्ये साध्य केली आहेत, किंबहुना ती ओलांडलीही आहेत आणि दीर्घकालीन शांततेसाठी एका ठोस कराराच्या दिशेने लक्षणीय प्रगती करत आहोत."

डोनाल्ड ट्रम्प यांनी असेही स्पष्ट केले आहे की, अमेरिकेला इराणकडून १०-कलमी प्रस्ताव मिळाला आहे. तो प्रस्ताव म्हणजे वाटाघाटींसाठी एक व्यावहारिक आधार म्हणता येईल. ट्रम्प यांच्या मते, बहुतेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधीच करार झाला आहे.

दोन आठवड्यांची शस्त्रसंधी मदत करेल!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, दोन आठवड्यांच्या या विरामामुळे दोन्ही बाजूंना कराराला अंतिम स्वरूप देण्याची संधी मिळेल आणि त्यांनी संकेत दिला की हा दीर्घकाळ चाललेला संघर्ष आता निराकरणाच्या जवळ पोहोचला आहे. पूर्वीच्या जवळपास सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर तोडगा झाला आहे आणि मध्य-पूर्वेत दीर्घकालीन शांततेच्या दिशेने प्रयत्न पुढे जात असताना या क्षणाला त्यांनी सन्मानाचे क्षण म्हटले आहे.

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी काय म्हणाले?

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी (Mojtaba Khamenei) यांनी शस्त्रसंधीच्या अंतिम करारावर प्रतिक्रिया दिली आहे. शस्त्रसंधी हा इराणचा विजय असल्याचं मोज्तबा खामेनेई यांनी म्हटलं आहे. मोजतबा खामेनेई यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतिम कराराची चर्चा इस्लामाबादमध्ये होणार आहे. मोज्तबा यांनीच सर्वोच्च सुरक्षा परिषदेच्या शस्त्रसंधी प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : US-Iran Ceasefire: Trump Halts Attacks for Talks, Pakistan Mediates.

Web Summary : Trump announced a two-week ceasefire with Iran for negotiations mediated by Pakistan. This pause, contingent on Iran reopening the Strait of Hormuz, follows a 10-point Iranian proposal. Khamenei hailed it as Iran's victory, discussions in Islamabad to follow.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणAmericaअमेरिकाUSअमेरिकाIsraelइस्रायलPakistanपाकिस्तान