शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुढील ४८ तासांत 'या' २ देशांमध्ये युद्ध पेटणार?; अमेरिकेसह आखाती देशात हायअलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 20:13 IST

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनीही ही माहिती दिली. या प्रकरणामुळे अमेरिका चिंतेत असल्याचे नेड प्राइस यांनी सांगितले.

इराण लवकरच सौदी अरब किंवा इतर कोणत्याही आखाती देशावर हल्ला करू शकतो. अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या गुप्तचर यंत्रणांनी सावधतेचा इशारा दिला आहे. ही माहिती मिळताच सौदी अरेबिया आणि अमेरिकेसह अनेक प्रादेशिक देशांचे सैन्य हाय अलर्टवर आहे. हिजाबच्या प्रदर्शनावरून जगाचे लक्ष वळवण्यासाठी इराण हल्ल्याच्या तयारीत असल्याचे गुप्तचरांनी सांगितले आहे. त्याचवेळी, न्यूज एजन्सी एपीच्या रिपोर्टनुसार, इराण पुढील ४८ तासांतच सौदी अरेबियावर हा हल्ला करू शकतो. इराण लवकरात लवकर ४८ तासांच्या आत हल्ला करू शकतो असं इंटेलिजन्स इनपुटची पुष्टी करणाऱ्या एका अधिकाऱ्याने एपीला सांगितले. 

मात्र, अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर संस्था पेंटागॉनच्या प्रवक्त्याने सौदी अरेबियासह इतर देशांतील अलर्टचा इशारा फेटाळून लावला. मात्र अमेरिका सतत सौदी अरेबियाच्या संपर्कात असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनीही ही माहिती दिली. या प्रकरणामुळे अमेरिका चिंतेत असल्याचे नेड प्राइस यांनी सांगितले. अमेरिका लष्करी, राजनयिक आणि गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून सौदी अरेबियाच्या संपर्कात आहे. असे काही घडल्यास या प्रदेशातील स्वत:चे आणि मित्रपक्षांचे हित जपण्यासाठी कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही असा इशारा अमेरिकेने दिला. 

इराणमध्ये महिलांचं हिजाब प्रदर्शनसध्या इराणमध्ये महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. महसा अमिनीला इराणच्या पोलिसांनी हिजाब नीट न घातल्यामुळे अटक केली होती, त्यानंतर तिचा कोठडीत मृत्यू झाला. तेव्हापासून इराणमध्ये हजारो लोक रस्त्यावर निदर्शने करत आहेत. या निदर्शनात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.

इराण सरकारने या निदर्शनामागे अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांचा हात असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्रांसोबत हिजाबचे प्रदर्शन घडवून आणलं आहे. गेल्या काही वर्षांत इराणने अशी अनेक लष्करी पावले उचलली आहेत. ज्यामुळे सौदी अरबसोबत आखती देशांशी इराणचा तणाव सुरू आहे. सप्टेंबरमध्ये इराकच्या कुर्दिश परिसरात इराणकडून ७० मिसाईल डागण्यात आली होती. इराकमध्ये अमेरिकेन सैन्य तैनात आहे. 

अमेरिका आणि सौदी अरबमध्येही ठीक नाहीइराणकडून हल्ल्याच्या नियोजनाची माहिती अशा वेळी समोर आली आहे जेव्हा अमेरिका आणि सौदी अरेबियामधील संबंध तणावपूर्ण आहेत. वास्तविक, अमेरिकेत मध्यावधी निवडणुका येणार आहेत. निवडणुकीपूर्वी सौदीचे वर्चस्व असलेल्या ओपेक प्लस संघटनेने तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला ते अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना हे कोणत्याही परिस्थितीत नको होते.

तेल निर्यातदार देशांची संघटना असलेल्या ओपेक प्लसच्या निर्णयावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता सौदी अरेबियासोबतच्या संबंधांवर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले. मात्र, सौदी अरेबियाने अमेरिकेच्या तीव्र नाराजीनंतर स्पष्टीकरण देत हा निर्णय पूर्णपणे आर्थिक संबंध असल्याचं म्हटलं होतं. या निर्णयामागे कोणतेही राजकीय कारण नसल्याचे सौदीकडून सांगण्यात आले.

टॅग्स :AmericaअमेरिकाIranइराण