शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध भडकलं तर त्या आगीत अमेरिका जळेल, इराणची धमकी; हल्ला झाला तर..., US चाही थेट इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 16:23 IST

इस्रायलने गाझावरील कारवाई थांबवली नाही, तर त्याला अनेक आघाड्यांवर युद्ध करावे लागेल. असा थेट इशारा ईरानचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियन यांनी इस्रायलला दिला आहे. 

हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये शिरून केलेल्या हल्ल्यानंतर, इस्रायली लष्कराकडून गाझा पट्टीसह लेबनानमधील दहशतवादी संघटनांवरही जबरदस्त बॉम्बिंग सुरू आहे. याच बरोबर, दोन आघाड्यांवर युद्ध लढत असलेल्या इस्रायलला आतापर्यंत इराण केवळ इशाराच देत होता. मात्र आता त्याने थेट युद्धात उडी घेण्याची धमकी दिली आहे.

इस्रायलने गाझावरील कारवाई थांबवली नाही, तर त्याला अनेक आघाड्यांवर युद्ध करावे लागेल. असा थेट इशारा ईरानचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियन यांनी इस्रायलला दिला आहे. 

इराणची अमेरिकेला धमकी -इराणने, इस्रायलची ढाल बनून उभ्या असलेल्या अमेरिकेलाही युद्धाच्या आगीत जाळण्याची धमकी दिली आहे. तर दुसरीकडे अरबी समुद्रात अमेरिकन लष्कराची तैनाती वाढत आहे. याच बरोबर, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी आधीच म्हटले आहे की, इराण अथवा त्याच्या समर्थक दहशतवादी संघटनांनी कुठल्याही अमेरिकन नागरिकावर हल्ला केला, तर आपल्या लोकांचे संरक्षण कसे करावे? हे अमेरिकेला माहीत आहे.

अमेरिकेचा इशारा -अमेरिकेला इराणसोबत युद्ध नको आहे. मात्र, इस्रायलजवळ पाठवण्यात आलेली अमेरिकन विमानं आणि लष्करी जहाजांची तैनाती पाहूनच इराणने संकेत समजून घ्यायला हवा, असे इशारा अमेरिकन संरक्षण मंत्र्यांनी तीन दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रात दिला आहे.

आपल्या नागरिकांना शस्रास्त्र वाटतोय इस्रायल -इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 21 दिवसांपासून जबरदस्त युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत जवळपास 9 हजार लोक मारले गेले आहेत. हे युद्ध आता आणखी रौद्र रूप धारण करण्याची चिन्ह आहेत. आता इस्रायलने आपल्या नागरिकांना युद्धासाठी तयार करायला सुरुवात केली आहे. इस्रायल त्यांना युद्धाचे प्रशिक्षण देणार आहे. इस्रायलचे पोलीसमंत्री इतामार बेन ग्विर यांनी इस्रायलच्या दक्षिणेकडील अश्कलोनमधील नागरिकांना शस्त्रास्त्रे वाटली आहेत. तसेच, युद्धाच्या पुढील टप्प्यासाठी इस्रायली सैनिक प्रशिक्षण घेत आहेत. 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षAmericaअमेरिकाIranइराण