शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायली जहाजावर इराणचा कब्जा; भारताकडे येणाऱ्या जहाजावर १७ भारतीय नागरिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 05:08 IST

Iran And Israel Issue: इराण आणि इस्रायल या दोन देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

दुबई: इराण आणि इस्रायल या दोन देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीत इस्रायलशी संबंधित एक मालवाहू जहाज हवाई हल्ला करून जप्त केले. हे जहाज भारताकडे निघाले असून त्यावर १७ भारतीय नागरिक असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायलने सीरियातील इराणी वाणिज्य दूतावासाच्या इमारतीवर हल्ला केला होता. त्यात रिव्होल्युशनरी गार्डच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह १२ जण ठार झाले होते. त्याचा बदला म्हणून इराणने ही कारवाई केली असल्याचे मानले जात आहे. इस्रायल गाझापट्टीत मागील ६ महिन्यांपासून हमासविरुद्ध युद्ध लढत आहे. जहाजावरील भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्रीय मंत्रालयाने संबंधित यंत्रणांशी बोलणी सुरु केली आहेत. 

हेलिकॉप्टरच्या साहाय्याने कमांडो जहाजावर उतरले- इराणची वृत्तसंस्था इरणाने सांगितले की, नौदल शाखेच्या विशेष दलांनी ही कारवाई केली. एका हेलिकॉप्टरचा वापर करून कमांडो जहाजावर उतरले. नंतर हे जहाज जप्त करण्यात आले. ब्रिटिश लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, आमिराती बंदर शहर फुजैराहजवळ ओमानच्या खाडीत ही घटना घडली.- इराणने केलेल्या या कारवाईचा एक व्हिडीओ ‘असोसिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेला मिळाला असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने कमांडो जहाजावर छापेमारी करीत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. 

जहाजाचे मालक कोण?प्राप्त माहितीनुसार, पोर्तुगीज ध्वज असलेल्या मालवाहू जहाजाचे नाव ‘एमएससी एरिस’ असे असून लंडनस्थित ‘झोडियाक मेरिटाइम’ या कंपनीशी ते संबंधित आहे. ही इस्रायली अब्जाधीश आयल ऑफेर यांच्या मालकीच्या ‘झोडियाक समूहा’तील एक कंपनी आहे.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायल