Strait of Hormuz: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिल्यानंतर इराणने मोठी घोषणा करत, होर्मुज सामुद्रधुनी सर्व देशांसाठी खुली असल्याचे सांगितले, मात्र शत्रू देशांच्या जहाजांना प्रवेश देणार नसल्याचेही स्पष्ट केले.
इराणचा मोठा निर्णय...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीबाबत महत्त्वपूर्ण भूमिका घेतली केली. इराणने म्हटले की, होर्मुज मार्ग सर्व देशांच्या जहाजांसाठी खुला आहे, मात्र इराणच्या शत्रू देशांशी संबंधित जहाजांना या मार्गाने जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. इराणचा इशारा अमेरिका, इस्त्रायल आणि काही गल्फ देशांकडे असल्याचे मानले जाते.
इराणचे प्रतिनिधी अली मौसवी यांनी सांगितले की, जे जहाज इराणच्या शत्रू देशांशी संबंधित नाहीत, ते सुरक्षा नियमांचे पालन करून या मार्गाने जाऊ शकतात. या घोषणेमुळे जागतिक तेल संकटाला काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, मात्र युद्धस्थितीमुळे हा मार्ग अजूनही अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.
भारतासाठी दिलासा मिळण्याची शक्यता
इराणच्या या निर्णयामुळे भारताला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या भारताची सुमारे २२ जहाजे होर्मुज सामुद्रधुनी परिसरात अडकलेली आहेत. भारत सरकारकडून इराणशी सतत संपर्क ठेवला जात असून, इराणच्या या विधानानंतर भारतीय जहाजांना मार्ग मिळण्याची शक्यता वाढली आहे. जर भारतीय जहाजांना या मार्गाने जाण्याची परवानगी मिळाली, तर देशातील संभाव्य ऊर्जा संकट टाळता येऊ शकते.
अमेरिकेचा ४८ तासांचा अल्टिमेटम
दरम्यान, इस्त्रायलवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांची चेतावणी दिली आहे. त्यांनी सांगितले की, जर इराणने कोणतीही अट न घालता ४८ तासांच्या आत होर्मुज सामुद्रधुनी पूर्णपणे खुली केली नाही, तर अमेरिका इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला करेल.
Web Summary : Amid US-Iran tensions, Iran declared the Strait of Hormuz open to all countries, except enemies. This decision offers potential relief for global oil markets and stranded Indian ships, following a US ultimatum regarding the strait's closure.
Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के बीच, ईरान ने होर्मुज जलडमरूमध्य को सभी देशों के लिए खोलने की घोषणा की, सिवाय दुश्मनों के। अमेरिका की चेतावनी के बाद यह निर्णय वैश्विक तेल बाजारों और फंसे हुए भारतीय जहाजों के लिए राहत प्रदान करता है।