पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाने आता अत्यंत भयंकर रूप धारण केले आहे. इराणनेइस्रायलमधील महत्त्वाचे शहर असलेल्या हायफावर रविवारी रात्री भीषण क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात एका मोठ्या अपार्टमेंटचा अर्धा भाग कोसळून दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण मध्य इस्रायलमध्ये धोक्याचे सायरन वाजत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
इमारत पत्त्यांसारखी कोसळली
मिळालेल्या माहितीनुसार, इराणने इस्रायलच्या दिशेने चार क्षेपणास्त्रे डागली होती. त्यापैकी एक क्षेपणास्त्र थेट हायफा शहरातील एका रहिवासी इमारतीवर थेट कोसळले. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, इमारतीचा अर्धा भाग जागीच कोसळला. उर्वरित इमारतही कमकुवत झाल्याने ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या बचाव कार्यात अडथळे येत आहेत.
रात्रभर बचावकार्य सुरू
घटनेची माहिती मिळताच इस्रायलचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्रभर चाललेल्या मोहिमेनंतर सोमवारी सकाळी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्याप दोन लोक बेपत्ता असून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. याच दरम्यान इराणकडून पुन्हा क्षेपणास्त्रे येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने मध्य इस्रायलमध्ये पुन्हा एकदा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हायफाच लक्ष्यावर का?
हायफा हे उत्तर इस्रायलमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले हे शहर इस्रायलसाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. लेबनॉनच्या सीमेजवळ असल्याने हे शहर हिजबुल्लाच्या रॉकेट हल्ल्यांच्या टप्प्यातही असते. मात्र, आता थेट इराणनेच हायफाला लक्ष्य केल्यामुळे हे युद्ध अधिक व्यापक होण्याची चिन्हे आहेत.
हवाई हल्ल्यांची मालिका सुरूच
सोमवारी सकाळी पुन्हा एकदा इराणकडून तीन क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, इस्रायलच्या अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिमने ही क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली, तर काही मोकळ्या मैदानात पडली. यामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी, इराणच्या सततच्या हल्ल्यांमुळे इस्रायलने आता मोठ्या प्रतिहल्ल्याची तयारी सुरू केली आहे.
Web Summary : Iran attacked Haifa with missiles, collapsing buildings and killing two. Israel's air defense intercepted subsequent attacks, but tensions are high. A counter-attack is likely as the conflict escalates. Haifa is strategically important.
Web Summary : ईरान ने हाइफा पर मिसाइलों से हमला किया, इमारतें गिरीं, दो की मौत। इज़राइल की वायु रक्षा ने बाद के हमलों को रोका, लेकिन तनाव अधिक है। जवाबी हमला होने की संभावना है, क्योंकि संघर्ष बढ़ रहा है। हाइफा रणनीतिक रूप से महत्वपूर्ण है।