शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:54 IST

असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट अशावेळी झाली आहे जेव्हा कुठल्याही क्षणी अमेरिका इराणविरोधात हल्ला करू शकते अशी चर्चा सुरू आहे.

इस्लामाबाद - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानी फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्याशी चर्चा केली. ट्रम्प यांनी इराण-इस्त्रायल युद्धात मुनीर यांच्याकडे एक प्रस्ताव ठेवला आहे. पाकिस्तानी सैन्याने त्यांचे एअरबेस वापरायला द्यावे असं अमेरिकेला वाटते. याआधी अफगाणिस्तानवरील हल्ल्यात पाकिस्तानने नूरखान एअरबेस अमेरिकेला वापरायला दिला होता. असीम मुनीर आणि ट्रम्प यांच्या भेटीमुळे इराण-इस्त्रायल यांना मोठा संकेत दिल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. 

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पाकिस्तान आणि इस्त्रायल यांच्यात संबंध खराब नाहीत. पाकिस्तानी नेतृत्व बहुतांश लोकांची अपेक्षा इराणपेक्षा चांगले ओळखते परंतु ट्रम्प यांचे विधान पाकिस्तानी नेत्यांच्या विधानापेक्षा उलटे आहे, जे सातत्याने इस्त्रायलवर टीका करून इराणचे समर्थन करतात. मुनीर यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला. जनरल मुनीर यांच्यासोबत इराणबाबत चर्चा झाली. इस्त्रायलसोबत त्यांचे वाईट आहे असं नाही. पाकिस्तानी दोघांना ओळखतात पण इराणबाबत त्यांना चांगली माहिती आहे. ते सध्या लक्ष ठेवून आहेत असं त्यांनी सांगितले. ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार ट्रम्प यांनी पाकिस्तानी सैन्याकडे इराणविरोधात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानात सैन्य प्रमुख ताकदवान असतो आणि परराष्ट्र धोरणात सैन्य प्रमुखाचे मत अखेरचे असते. 

असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट अशावेळी झाली आहे जेव्हा कुठल्याही क्षणी अमेरिका इराणविरोधात हल्ला करू शकते अशी चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांनी बऱ्याच वेळा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. परंतु मुनीर यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी संकेत दिले आहेत. इराणवर ट्रम्प यांच्याशी चर्चा झाल्याचे पाकिस्तानी सैन्यानेही मान्य केले. इराण-इस्त्रायल युद्धात मध्यस्थीची भूमिका निभावू असं पाकिस्तान सांगत आहे. त्यात इराण चर्चेला तयार असल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी म्हटलं.

दरम्यान, पाकिस्तान आणि इराण यांच्या अण्वस्त्राबाबत कित्येक जुने संबंध आहेत. पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक अब्दुल कादिर खान हे इराण आणि इतर देशांना त्यांच्या अणुकार्यक्रमासाठी सेंट्रीफ्यूज पुरवत होते असा संयुक्त राष्ट्राच्या अण्वस्त्रे देखरेख संस्थेचे आरोप आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणला पाठिंबा जाहीर केला आहे. मुनीर आणि ट्रम्प यांच्यातील बैठक खूप खास आहे. ही  १ तासाची चाललेली बैठक अमेरिका इराणवर हल्ला करणार आहे हे दर्शवते असं तज्त्रांनी म्हटलं. 

भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न

ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानी सैन्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्यात ट्रम्प आणि मुनीर यांच्या भेटीनंतर पाकिस्तानी सैन्यावर इराणविरोधात त्यांचे एअरबेस अमेरिकेला वापरण्यासाठी द्यावा असा दबाव वाढला आहे. पाकिस्तानी सैन्य याचा फायदा घेत अमेरिकेच्या माध्यमातून भारताला चर्चेसाठी आणि काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थीसाठी दबाव वाढवू शकते.   

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणIsraelइस्रायलPakistanपाकिस्तानAmericaअमेरिका