शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:20 IST

Iran Israel War : इराणची राजधानी तेहरानवर इस्त्रायलने हल्ले वाढवले आहे, यामुळे आता तेहरान शहरातील लोकांनी बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे.

Iran Israel War : मागील काही दिवसांपासून इस्त्रायल आणि इराणमध्ये तणाव सुरू आहे.इस्त्रायलने इराण शहराची राजधानी तेहरानवर हल्ले वाढवले आहे. या हल्ल्यांना घाबरुन आता लोकांनी शहर सोडण्यास सुरूवात केली आहे. शहरातील रस्त्यांवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महत्वाच्या रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. शहरातील लोक इराणच्या ग्रामीण भागात जात असल्याचे दिसत आहे. 

इस्त्रायलने इराणच्या तेहरान शहरावर हल्ले सुरुच ठेवले आहे. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. इस्रायली हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानमध्ये घबराटीचे वातावरण आहे. सतत होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे आणि बॉम्बहल्ल्यांमुळे जनता भीतीच्या छायेत आहे. 

Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!

तेहरानमधील सामान्य नागरिक हे शहर लवकरात लवकर सोडत आहेत. इस्रायल तेहरानवर सतत हल्ले करत आहे. काही लोक इराणच्या उत्तरेकडील ग्रामीण भागात पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. पण लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे रस्ते ठप्प झाले आहेत. लोक वाटेतच अडकले आहेत.

तेहरानमध्ये पेट्रोलसाठी अनेक किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेकांनी आपल्या मुलांसाठा घर सोडण्यास नकार दिलाय. अमेरिका दोन्ही देशांमधील हल्ले रोखण्यासाठी पावले उचलेल, अशा येथील नागरिकांची इच्छा आहे. 

इराणी सरकार लोकांची भीती कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. इराणी सरकारच्या प्रवक्त्या फतेमेह मोहजेरानी यांनी सरकारी टीव्हीला सांगितले की, इस्रायली हल्ल्यांदरम्यान इराणी लोक मशिदी आणि शाळांमध्ये तसेच मेट्रो सिस्टीममध्ये आश्रय घेऊ शकतात, ही रविवार रात्रीपासून खुली राहील.

"अन्न, औषध, इंधनाच्या उपलब्धतेत कोणतीही समस्या नाही," तेहरान सिटी कौन्सिलचे अध्यक्ष मेहदी चारमन म्हणाले, शहरात बॉम्ब निकामी केंद्रे नसल्यामुळे पर्याय शोधले जात आहेत. "दुर्दैवाने, तेहरान आणि इतर शहरांमध्ये प्रतिबंधक केंद्रे नाहीत," असे त्यांनी सांगितले. तळघर हा एक पर्याय आहे आणि "अत्यंत" परिस्थितीत, भूमिगत मेट्रोचा वापर केला जाऊ शकतो, परंतु तो बंद करावा लागेल.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराण