शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

संघर्ष पेटला; इस्रायलचा इराणसह आणखी दोन देशांवर हल्ला, इमारतींवर क्षेपणास्त्रे डागली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 4:00 PM

13 एप्रिलच्या मध्यरात्री इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

Iran-Israel War : मागील अनेक महिन्यांपासून इराण आणि इस्रायलदरम्यानयुद्ध सुरू आहे. गेल्या आठवड्यात, 13 एप्रिलच्या मध्यरात्री इराणने इस्रायलवर अचानक अनेक क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. त्यानंतर इस्रायल जोरदार प्रत्युत्तर देईल, अशी चर्चा सुरू झाली. आता त्या घटनेच्या बरोबर एका आठवड्यानंतर शुक्रवारी, म्हणजेच 19 एप्रिल रोजी इस्रायलने इराणवर हल्ला केला. विशेष म्हणजे, इस्रायलने फक्त इराण नाही, तर आणखी दोन देशांवरही हल्ला केला.

मीडिया रिपोर्टनुसार, इराणशिवाय इस्रायलने इराक आणि सीरियाला टार्गेट केले. इराकची राजधानी बगदादमधील एका इमारतीवर हवाई हल्ला करण्यात आला. या इमारतीत एक उच्चस्तरीय बैठक सुरू होती, ज्यामध्ये अनेक इराण समर्थित गट आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे सदस्य होते. सीरियातील अनेक रिपोर्टमध्ये असे म्हटले जात आहे की, इस्त्रायली हवाई हल्ल्यांनी दक्षिण सीरियातील अस-सुवेदा आणि दारा प्रांतातील सीरियन सैन्य उद्धवस्त झाली. मात्र, इराणने इस्रायलच्या हल्ल्याचे खंडन केले आहे. तर, इस्रायलनेही अद्याप या हल्ल्यांना अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

इराण-इराक-सीरिया मित्रराष्ट्रइराण आणि सीरिया, हे जवळचे मित्र आहेत. सीरिया सहसा इराणला आपले सर्वात जवळचे राष्ट्र मानतो. सिरियातील गृहयुद्धात इराणने सीरियन सरकारला जोरदार पाठिंबा दिला होता. इराण आपला मित्र देश सीरियाला सर्व प्रकारची मदत करतो. दोघांमध्ये आणखी एक समान दुवा आहे आणि तो म्हणजे अमेरिका. दोन्ही देशांचे अमेरिकेशी संबंध चांगले नाहीत आणि अमेरिकेला त्यांची मैत्री आवडत नाही. इराण आणि इराक यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधही कोणापासून लपलेले नाहीत. सीरिया आणि इराक हे मध्य पूर्वेतील इराणचे सर्वात मोठे मित्र आहेत.

इराणमधील इस्फहान शहर चर्चेत इस्रायलने शुक्रवारी इराणच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. इराणच्या आण्विक साइटवर तीन क्षेपणास्त्रे पडल्याची बातमी होती. दरम्यान, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने आपल्या सर्व लष्करी तळांना हाय अलर्टवर ठेवले आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने शुक्रवारी पहाटे इराणच्या इस्फहान शहरातील विमानतळाजवळ मोठा स्फोट झाल्याचे वृत्त दिले होते. इस्फहान शहरात अनेक अणु प्रकल्प आहेत. इराणचा सर्वात मोठा युरेनियम प्रोग्रामही याच ठिकाणात सुरू आहे. या स्फोटांनंतर अनेक उड्डाणे वळवण्यात आली. 

टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षInternationalआंतरराष्ट्रीयwarयुद्ध