शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इराणने शेवटपर्यंत हार मानली नाही, एका फोनमुळे युद्ध थांबले; कोणी केलेला तो फोन..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:38 IST

Iran-Israel War: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धाला आज अखेर ब्रेक लागला. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीस होकार दिल्यामुळे तणाव थांबला.

Iran-Israel War: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायलयुद्धाला आज अखेर ब्रेक लागला. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करण्यास होकार दिल्यामुळे हा तणाव थांबला. दरम्यान, यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कतारच्या शिफारशीवरुन इराण आणि इस्रायलमध्येयुद्धबंदीची मध्यस्थी केली. न्यूजवीक मासिकाने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाला देऊन हा खुलासा केला आहे.

अहवालात म्हटले आहे की, इराणने कतारवर क्षेपणास्त्रे डागताच कतारचे अमीर आणि पंतप्रधानांनी अमेरिकेकडे युद्धविरामासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. न्यूजवीकने अमेरिकन राजदूताचा हवाला देत म्हटले आहे की, कतारच्या शिफारशीवरून ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील त्यांचे राजदूत विटकॉफ यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर विटकॉफ यांनी त्यांच्या इराणी समकक्षांना फोन लावला.

कतारचे अमीर घोषणा होईपर्यंत अॅक्टिव्ह होतेसोमवारी मध्यरात्री इराणने कतारवर क्षेपणास्त्रे डागली आणि येथील अमेरिकन हवाई तळांना लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर कतार खडबडून जागा झाला आणि अमेरिकेकडे मदतीचे आवाहन केले. युद्धविरामाची घोषणा होईपर्यंत कतारचे अमीर आणि पंतप्रधान अॅक्टिव्ह होते. दोघेही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्याशी सातत्याने संपर्कात होते. 

इराणने ठेवली अट मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन राजदूत विटकॉफने इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांना फोन करताच परराष्ट्रमंत्र्यांनी एक अट ठेवली. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची म्हणाले की, इस्रायलने हल्ला थांबवला तरच हा प्रश्न सुटू शकेल. इस्रायलने युद्ध सुरू केले, हल्ला थांबवणे हेदेखील त्यांचे काम आहे. जर इस्रायलने हल्ला थांबवला, तर आम्हीही हल्ला करणार नाही. फोनवर विटकॉफने इराणला आश्वासन दिले की पुढील २४ तासांनंतर इस्रायल हल्ला करणार नाही. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवर बोलल्यानंतर, विटकॉफने व्हाईट हाऊसला आपला संदेश पाठवला. त्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धविरामाची घोषणा केली.

 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्धAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प