शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 08:50 IST

Iran Israel War : इस्त्रायलने इराणवर हल्ले वाढवले आहेत. तर दुसरीकडे इराणने वाटाघाटी करण्यास नकार दिला आहे.

Iran Israel War : इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव आणखी वाढला आहे. इराणने अण्वस्त्रांबाबत वाटाघाटी करण्यास नकार दिला आहे. यामुळे आता या दोन्ही देशात सुरु असलेले युद्ध पुन्हा वाढू शकते. युरोपीय देशांशी झालेल्या चर्चेत इराणने वाटाघाटी करण्यास नकार दिला. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि युरोपियन युनियन अणुप्रश्नी इराण आणि अमेरिकेत चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत.

शुक्रवारी युद्धाच्या आठव्या दिवशी इस्रायलने पुन्हा एकदा इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी तळांना लक्ष्य केले. इराणने दुसऱ्या दिवशीही प्रत्युत्तर म्हणून बीरशेबा शहराला लक्ष्य केले. बीरशेबा येथील मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या कार्यालयासमोर झालेल्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत.

iran israel news: इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना नेमके कधी मायदेशी आणलं जाणार?

शुक्रवारी इराणने पुन्हा हैफावर हल्ला केला, यामध्ये १७ जण जखमी झाले. इराणमध्ये, इस्रायली हल्ल्यांदरम्यान, हजारो लोक शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी घराबाहेर पडले आणि त्यांनी एकत्रितपणे इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध घोषणाबाजी केली.

अमेरिकेने अजूनही निर्णय घेतला नाही

इस्रायली सैन्याने इराणमधील लष्करी तळ, क्षेपणास्त्र निर्मिती कारखाने, संशोधन संस्था आणि अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी, मध्य तेहरानमधील एका निवासी इमारतीलाही इस्रायलने लक्ष्य केल्याचे वृत्त आहे. तर व्हाईट हाऊसने म्हटले आहे की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेतलेला नाही.

दोन आठवड्यांनंतर परिस्थितीचे मूल्यांकन करून ते अंतिम निर्णय घेतील. दरम्यान, अमेरिका इराणशी चर्चेची शक्यता आहे.

अमेरिकेच्या या भूमिकेनंतर, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे की, त्यांचे सैन्य इराणशी एकट्याने सामना करण्यास सक्षम आहे. तर जिनेव्हा येथे पोहोचलेले इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची म्हणाले, इस्रायली हल्ल्यांदरम्यान त्यांचा देश अमेरिकेशी बोलण्यास इच्छुक नाही.

जर अणुप्रश्नी चर्चा पुन्हा सुरू करायची असेल, तर इस्रायली हल्ले थांबवावे लागतील. इराणने प्रमुख युरोपीय देशांच्या समकक्षांशी झालेल्या चर्चेत हे म्हटले आहे. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिका