शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 11:55 IST

इराण आणि इस्राइल-अमेरिका यांच्यातील युद्ध आता आणखी तीव्र झाले आहे. ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने पुन्हा एकदा जोरदार हल्ला केला आहे. 

इराण आणि इस्राइल-अमेरिका यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस आणखीनच तीव्र होत चालले आहे. एकीकडे शांततेच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे हल्ले देखील सुरूच आहेत. अमेरिकन माध्यमांनी जारी केलेल्या माहितीनुसार, इराणने कुवेतच्या अली अल सलेम एअरबेसवर ड्रोन हल्ला केला असून, या हल्ल्यात जवळपास १५ लोक गंभीर जखमी झाले आहेत. या दरम्यान, सौदी अरेबियाने त्यांच्या पूर्व भागात आलेल्या ७ बॅलेस्टिक मिसाईल हवेतच रोखून नष्ट केल्या. या मिसाईलचा मलबा सौदीच्या वीज प्रकल्पाजवळ पडला आहे. 

आपल्यावर होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराण आता आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ले चढवत आहे. अमेरिकन मंत्री पीट हेगसेथ यांनी मंगळवारी माहिती देताने म्हटले की, आज इराणवर मोठे हल्ले केले गेले आहेत. त्यामुळे इराणने केलेला हल्ला हा अमेरिकेला दिलेले प्रत्युत्तर मानले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मोठा हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर लगेचच इराणने हे हल्ले केले आहेत. 

सौदीवरील हल्ल्यामुळे झाले मोठे नुकसान 

सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सौदीने मंगळवारी त्यांच्या पूर्व क्षेत्रात आलेल्या सात बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केल्या. या मिसाईल्सचा कचरा अजूनही त्याच्या वीज प्रकल्पाजवळ पडला आहे. नेमके किती नुकसान झाले आहे, याची तपासणी करण्याचे काम अद्याप सुरू असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. प्राथमिक आकडा ७ सांगितला जात असला, तरी नेमक्या किती मिसाईल यावेळी नष्ट करण्यात आल्या याचा स्पष्ट आकडा समोर आलेला नाही. 

कुवेतवर झालेल्या हल्ल्यात १५ सैनिक जखमी

दोन अमेरिकी अधिकाऱ्यांचा हवाला देत अमेरिकी माध्यमांनी वृत्त दिले आहे की, काल रात्री कुवेतच्या अली अल सालेम हवाई तळावर झालेल्या इराणी ड्रोन हल्ल्यात किमान १५ अमेरिकी नागरिक जखमी झाले. इराणने या प्रदेशातील अमेरिकी तळांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. इराणने मंगळवारी केवळ या प्रदेशातील अमेरिकी तळांवरच हल्ला केला नाही, तर इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रेही डागली.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Defies Trump's Threat, Launches Attacks; Saudis Targeted, Kuwait Hit

Web Summary : Iran escalates conflict, attacking US bases in the Gulf after Trump's threat. Missiles targeted Saudi Arabia, while a drone strike on Kuwait injured 15 Americans. Tensions rise amid ongoing peace talks.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर