Iran Crisis:इराणमध्ये अलीकडे उसळलेल्या देशव्यापी आंदोलनांबाबत सरकारने मोठी माहिती दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने सांगितले की, या आंदोलनात आतापर्यंत किमान 5 हजार मृत्यूंची अधिकृत पुष्टी झाली असून, त्यामध्ये सुमारे 500 सुरक्षाकर्मी समाविष्ट आहेत. या हिंसाचारासाठी परदेशी पाठबळ असलेले दहशतवादी आणि सशस्त्र उपद्रवी जबाबदार असल्याचा आरोप सरकारने केला आहे.
रिपोर्ट्सनुसार, सुरक्षा कारणास्तव नाव न सांगणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते, उत्तर-पश्चिम ईरानमधील कुर्दबहुल भागात सर्वाधिक हिंसाचार आणि जीवितहानी झाली. हा प्रदेश यापूर्वीही अस्थिरतेसाठी ओळखला जातो. येथे सक्रिय असलेल्या कुर्द विभाजनवादी गटांमुळे याआधीच्या मोठ्या आंदोलनांतही तीव्र हिंसाचार झाल्याचे नमूद करण्यात आले.
मृत्यूंची संख्या आणखी वाढणार?
सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, मृतांचा आकडा यापुढे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यांनी आरोप केला की, रस्त्यावर उतरलेल्या सशस्त्र गटांना इस्रायल आणि परदेशात सक्रिय असलेल्या संघटनांकडून मदत व शस्त्रास्त्रे पुरवली गेली. इराण सरकार याआधीही देशांतर्गत अशांततेसाठी परकीय शक्तींना जबाबदार धरत आले आहे. विशेषतः इस्रायल आणि अमेरिकेवर कटकारस्थानांचे आरोप आहे.
मानवाधिकार संस्थांचे वेगळे आकडे
सरकारी आकड्यांपेक्षा वेगळी माहिती मानवाधिकार संस्थांकडून समोर आली आहे. अमेरिकास्थित मानवाधिकार संघटना HRANAच्या मते, आतापर्यंत 3,308 मृत्यू नोंदवले गेले आहेत, तर 4,382 प्रकरणांची तपासणी सुरू आहे. याशिवाय, 24,000 हून अधिक अटक करण्यात आल्या आहेत.
19 दिवसांच्या हिंसाचारात प्रचंड नुकसान
सलग 19 दिवस चाललेल्या आंदोलनांनंतर सध्या परिस्थिती तुलनेने शांत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र या काळात सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 30 प्रांतांमध्ये 250 मशिदी व 20 धार्मिक केंद्रे बाधित झाले, 182 रुग्णवाहिका व अग्निशमन उपकरणांचे सुमारे 5.3 दशलक्ष डॉलरचे नुकसान झाले. 317 बँक शाखाही पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या असून, 4,700 बँकांना 10% ते 90% पर्यंत नुकसान झाले आहे.
Web Summary : Iran reports 5,000 deaths, including security personnel, in recent protests. The government blames foreign-backed terrorists for the violence. Rights groups claim lower figures. Extensive damage to property occurred during 19 days of unrest.
Web Summary : ईरान में हालिया विरोध प्रदर्शनों में सरकार ने सुरक्षा कर्मियों सहित 5,000 मौतों की सूचना दी। सरकार ने हिंसा के लिए विदेशी समर्थित आतंकवादियों को दोषी ठहराया। अधिकार समूहों ने कम आंकड़े बताए। 19 दिनों की अशांति के दौरान संपत्ति का व्यापक नुकसान हुआ।