शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

आता इराणनं जागे केले 'झोपलेले शिकारी'! अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा; 'तो' एन्क्रिप्टेड मेसेज नेमका काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:32 IST

लष्करी पातळीवर इस्रायलने सोमवारी इराणच्या मध्यवर्ती भागावर आणि बैरूतमध्ये हिजबुल्लाच्या तळांवर जोरदार हल्ले चढवले. यापूर्वी इस्रायलने तेहरानमधील ऑईल डेपो उडवून दिला होता. याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडूनही क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे इस्रायलसह मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांवर हल्ले केले जात आहेत.

गेल्या अकरा दिवसांपासून इराण आणि इस्रायल-अमेरिकाय यांच्या तुंबळ युद्ध सुरू आहे. ही परिस्थिती आणखी स्फोटक होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांच्या निधनानंतरही हे युद्ध थांबलेले नाही. उलट आता, एका ताज्या रिपोर्टनुसार, खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणने एका विशिष्ट सिग्नलद्वारे आपल्या जगभरातील 'स्लीपर सेल्स'ना सक्रिय केल्याचा दावा केला जात आहे.

गोपोनीय संदेशात नेमकं काय? - एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, इराणमधून पाठवण्यात आलेला एक 'एन्क्रिप्टेड' मेसेज अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागला आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात खामेनेई यांचा मृत्यू झाला. यानंतर, लगेचच हा मेसेज पाठवण्यात आला. प्राथमिक सिग्नल विश्लेषणानुसार, हा संदेश इराणमधून आला होता, असे फेडरल अलर्टमध्ये म्हणण्यात आले आहे.

गुप्तचर संस्था किंवा दहशतवादी गटांकडून, असे संदेश अनेक वेळा पाठवले जातात -हा मेसेज अनेक देशांमध्ये पुन्हा प्रसारित करण्यात आला, हे असामान्य आहे. संदेश पूर्णपणे एन्क्रिप्टेड होता आणि केवळ 'डिक्रिप्शन की' असलेल्यां लोकांनाच तो वाचणे शक्य आहे. इंटरनेट अथवा मोबाइल नेटवर्कचा कोणताही ट्रेस लपविण्यासाठी गुप्तचर संस्था किंवा दहशतवादी गटांकडून, असे संदेश अनेक वेळा पाठवले जातात.

दरम्यान, अलर्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, "हे ट्रान्समिशन बाह्य स्लीपर अ‍ॅसेट्सना सक्रिय करण्यासाठी किंवा सूचना देण्यासाठी पाठवले गेले असण्याची शक्यता आहे. मात्र हा संदेश नेमका काय हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, नवीन स्टेशनद्वारे अचानकपणे आंतरराष्ट्रीय पुनर्प्रसारण होणे ही चिंतेची बाब आहे." मात्र, एखाद्या विशिष्ट ठिकाणी अद्यापतरी धोक्याचा इशारा देण्यात आलेला नाही.

इस्रायलकडून इराणच्या मध्यवर्ती भागावर आणि बैरूतमध्ये हिजबुल्लाच्या तळांवर जोरदार हल्ले -लष्करी पातळीवर इस्रायलने सोमवारी इराणच्या मध्यवर्ती भागावर आणि बैरूतमध्ये हिजबुल्लाच्या तळांवर जोरदार हल्ले चढवले. यापूर्वी इस्रायलने तेहरानमधील ऑईल डेपो उडवून दिला होता. याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडूनही क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे इस्रायलसह मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांवर हल्ले केले जात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Activates 'Sleeper Cells'? US Intel Claims Encrypted Message Sent.

Web Summary : Following Ayatollah Khamenei's death, Iran allegedly activated global sleeper cells via an encrypted message. US intelligence intercepted the message, raising concerns about potential coordinated actions. Israel and Iran are engaged in escalating attacks.
टॅग्स :IranइराणWarयुद्धAmericaअमेरिकाUSअमेरिका