शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव यांची सुटका होणार? आंतरराष्ट्रीय कोर्ट आज देणार निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 12:03 IST

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा रक्षकांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली होती.

ठळक मुद्देगुप्तहेर कारवायाच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना 2016 मध्ये अटक केली होती. पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तान कोर्टाच्या निर्णयाविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली

नवी दिल्ली : कथित हेरगिरी व दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयातील खटल्याचा निकाल आज लागणार आहे. या सुनावणीसाठी पाकिस्तानची कायदे विषयक टीम हेग येथे पोहचली आहे. 

पाकिस्तानी मीडियानुसार पाकच्या कायदे विषयक टीमचे नेतृत्व ज्येष्ठ वकील मंसूर खान करत आहेत. त्याच टीमसोबत पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहम्मद फैसलदेखील उपस्थित आहेत. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेला पाकिस्तानकडून विरोध केला जाणार आहे. 

 

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा रक्षकांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली होती. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने विरोध केला आहे. 

 

भारताचं म्हणणं आहे की, कुलभूषण जाधव यांनी निवृत्ती घेतली आहे. ते व्यापाराच्या दृष्टीकोनातून इराणला गेले होते. ज्याठिकाणाहून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे अपहरण केले. पाकिस्तान न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना दिलेल्या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तान कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. 

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुलक्वी अहमद युसूफ या खटल्याचा निकाल देणार आहेत. कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करण्याचा आदेश पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने द्यावा म्हणून तिथे भारताने दाद मागितली होती. जाधव यांचा भारतीय राजदूतावासाशी संपर्क होऊ न देणे, खोट्या पुराव्यांवर खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावणे अशी कृत्ये करून पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा भंग केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कोर्टाकडून कुलभूषण जाधव प्रकरणात काय निकाल येतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.  

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तानIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयCourtन्यायालय