शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंटरेस्टींग स्टोरी! दहशतवादी होण्यासाठी 28 वर्षांपूर्वी घरातून निघून गेला अन् गायक बनून परत आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 13:14 IST

अल्ताफ मीर यांनी 28 वर्षापूर्वी दहशतवादी बनण्यासाठी घरातून पलायन गेले होते. मात्र, ते गायक बनल्याची त्यांची इंटरेस्टींग स्टोरी आहे.

श्रीनगर - पाकिस्तानच्या कोक स्टुडिओने आपल्या युट्युब चॅनेलवरुन नुकतेच एक गाणे प्रदर्शित केले आहे. 'हा गुलो' असे या गाण्याचे बोल असून अतिशय कमी वेळेत हे गाणे संगीतप्रेमींमध्ये लोकप्रिय बनले आहे. केवळ दोनच दिवसात या गाण्याला युट्यूब दीड लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. इंटरनेटवर हिट होत असलेल्या या गाण्याला काश्मीरमधील अनंतनागच्या मोहम्मद अल्ताफ मीर यांनी गायले आहे. विशेष म्हणजे अल्ताफ मीर यांनी 28 वर्षापूर्वी दहशतवादी बनण्यासाठी घरातून पलायन गेले होते. मात्र, ते गायक बनल्याची त्यांची इंटरेस्टींग स्टोरी आहे.

अल्ताफ मीर यांचे जीवन अतिशय वळणावळणाचे राहिले आहे. सन 1990 मध्ये म्हणजेच 28 वर्षांपूर्वी मीर यांनी दहशतवादी संघटनात सहभागी होण्यासाठी आपले घर सोडले. शेकडो तरुणांसमवेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये मीर यांनी प्रवेश केला. त्यानंतर कुटुंबीयांशी अल्ताफ यांचा कुठलाही संपर्क राहिला नाही. त्यामुळेच अल्ताफ दशतवाद्यांच्या लढाईत ठार झाल्याचे कुटुबीयांना वाटले. मात्र, 2017 नंतर अल्ताफच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. पाकिस्तानच्या कोक स्टुडिओ टीमने नवीन प्रतिभावंत कलाकारांसाठी स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेसाठी निवडलेल्या 7 बँडपैकी अल्ताफ मीर यांच्या कसमीर बँडचीही निवड करण्यात आली. तर गेली कित्येक वर्षे मीर हे पाकिस्तान रेडिओसोबतही जोडले गेले आहेत. पण, कोक स्टुडिओतून संधी मिळाल्यानंतर मीर हे गायक म्हणून जगासमोर आले.

अल्ताफ यांच्या या यशामुळे 28 वर्षानंतर मीर यांच्या कुटुंबात आनंदी-आनंद झाला आहे. 28 वर्षांपूर्वी दहशतवादी बनण्यासाठी ज्या युवकाने घर सोडले, तो तरुण आज सिंगिंग स्टार बनला आहे. आता, अल्ताफच्या कुटुंबीयांनीही त्याच्या वाटेकडे डोळे लावले आहेत. लवकरच आपला मुलगा घरी परत येईल, अशी आशा मीर यांच्या अनंतनाग येथील कुटुबातील सदस्यांना आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादYouTubeयु ट्यूब