शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ख्राईस्टचर्च येथील मशिदीवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी घडवले साखळी बॉम्बस्फोट, श्रीलंकेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 15:15 IST

रविवारी कोलंबोमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोलंबो - रविवारी कोलंबोमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिनाभरापूर्वी न्यूझीलंडमधील मशिदीत करण्यात आलेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी श्रीलंकेमध्ये चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले, असे श्रीलंकेच्या उपसंरक्षण मंत्र्यांनी  आज संसदेत सांगितले. श्रीलंकेमध्ये रविवारी घडवून आणलेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये सुमारे 320 जणांचा मृत्यू झाला आहे.  तर महिनाभरापूर्वी ख्राईस्टचर्च येथे दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबारात सुमारे 50 जणांचा मृत्यू झाला होता. 

रविवारी जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले होते. या बॉम्बस्फोटात 320 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर 500 हून अधिक जण जखमी झाले होते या घटनेनंतर संपूर्ण श्रीलंकेमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे.  श्रीलंकेतील स्थानिक इस्लामी कट्टरवादी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) हिचा या साखळी बॉम्बस्फोटांमागे हात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र कुठल्याही संघटनेने आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. दरम्यान, गोपनीय माहितीनुसार स्थानिक दहशतवाद्यांसह काही परदेशी दहशतवाद्यांचा या हल्ल्यामागे हत असण्याची शक्यता आहेत. त्यामुळे  या हल्ल्याच्या तपासामध्ये अन्य देशांनी मदत करावी, असे आवाहन श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी केले आहे.   श्रीलंकेचे आरोग्यमंत्री रजिथा सेनारत्ने यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, श्रीलंकेतील स्थानिक संघटना एनटीजे या हल्ल्यांमध्ये सामील आहे. मात्र त्यांचे बाहेरील संघटनांशी त्यांची हातमिळवणी झाली आहे की नाही याची आम्हाला माहिती नाही. या हल्ल्यांप्रकरणी अटक करण्यात आलेले संशयित हे स्थानिक आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय नेटवर्कच्या सहकार्याशिवाय असे हल्ले करता येऊ शकत नाहीत, 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाNew Zealandन्यूझीलंडBlastस्फोटTerror Attackदहशतवादी हल्ला