शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लक्षणे न आढळणाऱ्या रुग्णांच्या वस्तू वापरल्याने संसर्ग होत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 03:23 IST

जागतिक आरोग्य संघटना : विविध देशांतील रुग्णांचा अभ्यास

जिनेव्हा : लक्षणे न आढळणाऱ्या ‘कोविड-१९’च्या रुग्णांच्या दैनंदिन वापरातील वस्तू वापरल्याने संसर्ग होत नाही, असा निष्कर्ष वूहानमध्ये करण्यात आलेल्या बाधितांच्या अभ्यासानंतर काढण्यात आला आहे. चीनमध्येही नुकतेच या अभ्यासाचे निष्कर्ष सार्वजनिक करण्यात आले. यानुसार, ‘कोविड-१९’चे माहेरघर असलेल्या वूहानमध्ये सुमारे १ कोटी नागरिकांमध्ये कोणतीही लक्षणे नसलेले ३०० रुग्ण आढळले आहेत. चीनमधील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, लक्षणे नसलेल्या वूहानमधील ३०० रुग्णांचा टूथब्रश, मग, टॉवेल, मास्क अशा वस्तू वापरणाºया १ हजार १७४ नागरिकांचाही अभ्यास करण्यात आला. विशेष म्हणजे, या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

लक्षणे नसलेल्या बाधिताकडून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नाही, असा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. यासोबतच लक्षणे नसलेल्या बाधितांच्या वस्तू वापरणाऱ्यांना संसर्ग झाला नसल्याच्या निष्कर्षामुळे तज्ज्ञांना सुखद धक्का बसला आहे.साथरोग विशेषज्ज्ञ मारिया वॅन केरकोव या जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन आजार तसेच पशूंपासून मानवाला होणाºया आजार या विभागाच्या प्रमुख आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘अनेक देशांतील उपचार घेणाºया रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांपैकी आजाराची कोणतीही लक्षणे नसलेल्या बाधितांचा आम्ही अभ्यास केला. अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ‘कोविड-१९’ संदर्भातील कोणताही त्रास जाणवला नाही.’’ (वृत्तसंस्था)येथेही डब्ल्यूएचओचे घूमजावच्मार्च तसेच एप्रिल महिन्यात ही साथ जगभर वेगात पसरत होती. या काळात कोणतीही लक्षणे नसलेली अनेक प्रकरणे समोर येत होती. परंतु तेव्हा डब्ल्यूएचओने अशा रुग्णांकडूनदेखील संसर्ग पसरत असल्याचे म्हटले होते. संसगार्बाबत डब्ल्यूएचओसारख्या जबाबदार संस्थेने अनेकदा अशी विसंगत भूमिका घेतल्याने अनेक देशांकडून प्रश्न उपस्थित केले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPositive on Coronaसकारात्मक कोरोना बातम्या