Indus Waters Treaty: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानसोबत गेल्या साठ वर्षांपासून असलेला सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे. पाकिस्तानमधील सुमारे 80 टक्के शेती सिंधूच्या पाण्यावर अवलंबून आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची दुखती नस दाबली गेली आहे. यामुळे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी याने भारताला थेट रक्तपाताची धमकी दिली होती. पण, आता पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या पाकिस्तानने माघार घ्यायला सुरुवात केली आहे.
पाण्यावरुन युद्ध लढली जातील...शुक्रवारी (23 मे 2025) पाकिस्तानी संसदेत सिंधू पाणी कराराबाबत चर्चा झाली. यावेळी खासदार सय्यद अली जफर याने आपल्या भाषणात म्हटले की, पाण्याचा प्रश्न पाकिस्तानसाठी दहशतवादाच्या मुद्द्याइतकाच महत्त्वाचा आहे. सिंधू पाणी करार स्थागित करणे आपल्यावर लादलेले एकप्रकारे युद्धच आहे. 21व्या शतकातील युद्धे पाण्यावरून लढली जातील, हे आज सिद्ध होत आहे.
...तर आपण मरू शकतोतो खासदार पुढे म्हणतो, पाकिस्तान हा पाण्याची सर्वाधिक कमतरता असलेला जगातील क्रमांक एकचा देश आहे. आज देश वेगाने पाणीटंचाईकडे वाटचाल करत आहे. याची दोन कारणे आहेत, पहिले हवामान बदल आणि दुसरे लोकसंख्या. म्हणून, हे दहशतवादाइतकेच महत्त्वाचे आहे. सिंधू खोरे ही आपली जीवनरेखा आहे. देशातील तीन चतुर्थांश पाणी बाहेरून येते. देशातील 10 पैकी 9 लोक सिंधू जल खोऱ्याच्या मदतीने आपले जीवन जगत आहेत. पाकिस्तानमधील सर्व वीज प्रकल्प आणि धरणे याच पाण्यावर बांधली आहेत. हा आपल्यावर पडलेला वॉर बॉम्ब आहे, जो आपल्याला निकामी करायचा आहे. आपण हा पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, तर आपण उपासमारीने मरू शकतो, अशी भीती त्याने व्यक्त केली.