शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भारत-अमेरिकेची मैत्री जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी प्रभावी शक्ती : मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 06:33 IST

मोदी यांनी अमेरिकी उद्योगाला भारतासोबत मेक इन इंडिया आणि स्वावलंबी भारत कार्यक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रातील उत्पादनासाठी भारताशी करण्यासाठी निमंत्रित केले.

टोकियो :  भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध हे खऱ्या अर्थाने  विश्वासाची भागीदारी आहे. दोन्ही देशांदरम्यानची मैत्री जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी प्रभावी शक्ती म्हणून कायम राहील, असे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. तसेच  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत अधिक समृद्ध, मुक्त आणि सुरक्षित  जगासाठी काम करण्याचा संकल्पही मोदी यांनी व्यक्त केला. दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका सुरक्षा आणि आर्थिक संपर्क अधिक दृढ करण्याची बांधिलकी व्यक्त केली. क्वाड शिखर परिषदेचे औचित्य साधून दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि अमेरिकेन मंगळवारी  सुरक्षा संस्थेदरम्यान   उदयोन्मुख आणि महत्त्वपूर्ण तंत्रशास्त्रामध्ये सहकार्य वाढविण्यासाठी मोठ्या भागीदारीची घोषणा केली.

मोदी यांनी अमेरिकी उद्योगाला भारतासोबत मेक इन इंडिया आणि स्वावलंबी भारत कार्यक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रातील उत्पादनासाठी भारताशी करण्यासाठी निमंत्रित केले. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक सातत्याने विस्तारित होत आहे; परंतु क्षमतेपक्षा कमी आहे, असे मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमची सामाईक मूल्ये आणि सुरक्षेसाठी अनेक क्षेत्रांतील समान हित परस्परातील विश्वसाचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. लोकांसोबतचे तसेच घनिष्ठ आर्थिक संबंधामुळे आमची भागीदारी अद्वितीय करते. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, द्विपक्षीय बैठकीचा निष्कर्ष ठोस फलनिष्पत्ती झाली. (वृत्तसंस्था)

उदयोन्मुख तंत्रशास्त्र उपक्रमाची घोषणाद्विपक्षीय चर्चेनंतर नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनने  निष्कर्षभिमुख सहकार्यासाठी भारत-अमेरिकेचा महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रशास्त्र उपक्रम सुरू केल्याची घोषणा केली. या नवीन यंत्रणा भारतीय राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सह-नेतृत्वाखाली असेल.

nभारत आणि अमेरिकेने  दीर्घकालीन लस कृती कार्यक्रमाला २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय  घेतला.nभारत संयुक्त लष्करी फौज-बहरीनमध्ये एक सहयोगी सदस्य सामील होत असल्याची घोषणा व्हाइट हाउसने स्वतंत्रपणे केली.nभारत-अमेरिकेचा महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रशास्त्र उपक्रमाने कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम काॅम्प्युटिंग,  ५-जी, ६-जी, बायोटेक, अंतराळ आणि सेमीकंडक्टर या क्षेत्रात दोन्ही देशांचे सरकार,  शिक्षण आणि उद्योगांदरम्यान घनिष्ठ संबंध होतील.nव्हाइट हाउसने जारी केलेल्या निवेदनानुसार बायडेन यांनी युक्रेनविरुद्ध रशियाच्या युद्धाचा निषेध केला.nदोन्ही नेत्यांनी युद्धामुळे उद्भवलेल्या समस्या विशेषत: ऊर्जा आणि अन्नधान्याच्या भाववाढीची समस्या दूर करण्यासाठी कसे सहकार्य करायचे, या मुद्यावरही चर्चा केली.nअमेरिकेची २०२२ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, डाटा विज्ञान, कृषी, आरोग्य आणि हवामान या क्षेत्रात संयुक्त संशोधनासाठी भारताच्या सहा  तंत्रशास्त्र नवोन्मेषी केंद्रात सामील होण्याची योजना आहे.

चीनला शह देण्यासाठी ‘क्वाड’चा नवीन उपक्रमभारतासह चार देशांची संघटना असलेल्या संघटनेने (क्वाड) हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील समुद्री हालचालींवरील निगराणी सुधारण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. चीनच्या वाढत्या दामदाट्यामुळे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. क्वाड संघटनेच्या नेत्यांनी शिखर परिषदेच्या समोरापात  हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र जागरूकता (आयपीएमडीए) उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली. सर्व नेत्यांनी मुक्त हिंद-प्रशांत महासागराप्रती कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला, तसेच या क्षेत्रासाठी ठोक निष्कर्षभिमुख उद्देशाने प्रयत्न करण्याचा निर्धार केला. त्यामुळे हे क्षेत्र स्थिर आणि समृद्ध हाेईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाJapanजपान