शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सौदीला जाणारं विमान अचानक 'कराची'त उतरवलं; पाकिस्तानने वाचवला एका भारतीयाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 13:51 IST

१३ डिसेंबरच्या रात्री ९.१५ मिनिटांनी हे विमान दिल्लीहून उडाले होते. रात्री ११ च्या सुमारास विमानाने कराचीत लँडिंग केले.

कराची - शुक्रवारी रात्री नवी दिल्लीहून सौदी अरबला जाणाऱ्या इंडिगो विमानाचं पाकिस्तानातील कराचीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. मेडिकल इमरजेंसीमुळे पाकिस्तानच्या कराची येथील जिन्ना इंटरनॅशनल एअरपोर्टवर हे विमान उतरवण्यात आले. सकाळी या विमानाने सौदी अरबसाठी उड्डाण घेतले होते. 

पाकिस्तानी हवाई क्षेत्रात प्रवेश करताच विमानातील एका प्रवाशाची तब्येत अचानक बिघडली.  ऑक्सिजन दिल्यानंतरही तब्येत सुधारली नव्हती. प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याचं पाहताच विमानाच्या पायलटनं कराचीतील एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला. त्यानंतर मानवतेच्या दृष्टीने कराचीतील एअरपोर्ट ट्रॅफिक कंट्रोलने भारतीय विमानाला लँडिंगची परवानगी दिली. यावेळी एअरपोर्टवरील मेडिकल सुविधेसाठी असणाऱ्या स्टाफने विमानाचे लँडिंग होताच आजारी प्रवाशावर उपचार सुरू केले. ज्या प्रवाशाची तब्येत खराब झाली त्यांचे वय ५५ होते.

१३ डिसेंबरच्या रात्री ९.१५ मिनिटांनी हे विमान दिल्लीहून उडाले होते. रात्री ११ च्या सुमारास विमानाने कराचीत लँडिंग केले. ३ तासानंतर १.५५ च्या सुमारास कराचीतून हे विमान पुन्हा दिल्लीकडे आले. पाक मीडियाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, ५५ वर्षीय पुरुष प्रवासी पाकिस्तानी हवाई हद्दीत असताना गंभीर आजारी पडले. त्या व्यक्तीची प्रकृती पाहून इंडिगो फ्लाइटच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला ऑक्सिजन दिला पण त्याची प्रकृती सुधारली नाही उलट ती आणखी बिघडली. मानवतावादी आधारावर निर्णय घेत वैमानिकाने कराची एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी मागितली. कराची एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून परवानगी मिळाल्यानंतर विमान कराचीच्या दिशेने वळवण्यात आले.

पाकिस्तान नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या वैद्यकीय पथकाने तात्काळ विमानात चढून प्रवाशाला वैद्यकीय सुविधा पुरवल्या त्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर झाली. पाकिस्तानी मीडियानुसार, आजारी प्रवाशाला औषधेही देण्यात आली आहेत. परिस्थिती स्थिर झाल्यानंतर विमानाने कराचीहून उड्डाण केले आणि सौदीला जाण्याऐवजी दिल्लीला परतले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतIndigoइंडिगो