शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त राष्ट्रात भारताचा वरचष्मा, INCBच्या लढाईत चीनला पछाडत मिळवला विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 10:58 IST

संयुक्त राष्ट्रात भारतानं पुन्हा एकदा वरचष्मा राखला आहे.

वॉशिंग्टनः संयुक्त राष्ट्रात भारतानं पुन्हा एकदा वरचष्मा राखला आहे. भारताच्या जगजित पोवाडिया यांची इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डा(INCB)च्या सदस्यपदी पुन्हा निवड झाली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या चीनच्या हाओ वेई यांचा पराभव करत लक्षणीय मतांसह विजय मिळवला आहे.  संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या पहिल्या फेरीच्या मतदानात जगजित पोवाडिया यांना 44 मतं मिळाली. खरं तर निवडणूक जिंकण्यासाठी फक्त 28 मतांची गरज असते. मंगळवारी 54 सदस्यीय इकोनॉमिक अँड सोशल काऊंसिलच्या 5 सदस्यांच्या निवडीसाठी मतदान घेण्यात आलं. या 5 सदस्य जागांसाठी 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. संयुक्त राष्ट्रात भारताचे राजदूत असलेल्या सैय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. जगजित पोवाडिया यांनी INCBच्या सदस्यपदी पुन्हा निवड झाल्यानं आनंद व्यक्त केला आहे. तसेच निष्पक्षरीत्या मी सेवा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.चीननं आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी विकसनशील देशांबरोबर लॉबिंग करण्याचा प्रयत्न केला होता. तरीसुद्धा चीनला पराभव पत्करावा लागला आहे. चीनच्या हाओ वेई यांना पहिल्या टप्प्यात फक्त 22 मतं मिळाली, तर दुसऱ्या टप्प्यात फक्त 19 मतं मिळाली. ते निवडणूक जिंकण्यासाठी लागणारी 28 मतं मिळवू शकले नाहीत. तर दुसरीकडे भारताच्या जगजित पोवाडिया यांना 44 मतं मिळाली आहेत. पोवाडिया यांच्याबरोबरच फ्रान्स आणि कोलंबोचे उमेदवार निवडणूक जिंकण्यात यशस्वी ठरले. त्यांचा कार्यकाळ 2 मार्च 2020मध्ये सुरू होणार असून, 2025मध्ये ते त्या पदावर राहणार आहेत.