शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

विविधतेतील एकता हीच भारताची शक्ती - मोदी

By admin | Updated: November 13, 2015 23:58 IST

भारताची विविधता हीच आपली शान आणि शक्ती आहे, भारताला कबीर आणि रहीमची शिकवण प्रेरणा देते, भारतीय जगात जिथे गेले, तिथे सर्वांसोबत मिळून राहण्याचे संस्कार घेऊन गेले आहेत

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. १३ -  भारताची विविधता हीच आपली शान आणि शक्ती आहे, भारताला कबीर आणि रहीमची शिकवण प्रेरणा देते, भारतीय जगात जिथे गेले, तिथे सर्वांसोबत मिळून राहण्याचे संस्कार घेऊन गेले आहेत, असे व्यक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, ते ३ दिवसाच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. लंडनमधील वेम्बले स्टेडियममध्ये ६०,००० अनिवासी भारतीयांना ते संबोधित करत होते. वेम्बले स्टेडियममध्ये नरेंद्र मोदींचे स्वागत ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी केले. 
>> लंडनमधील वेम्बले स्टेडियममधील मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे 
-  दहशतवाद आणि ग्लोबल वॉर्मिंग जगापुढील सर्वात मोठी समस्या आहे. 
-  भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. 
-  ब्रिटिश संसदेसमोर महात्मा गांधी यांचा पुतळा असणे गौरवाची बाब आहे.
-  महात्मा गांधी यांचा संदेश जगासाठी प्रेरणादायक 
-  जो देश तरुण आहे, तो देश विकासाच्या स्पर्धेत मागे राहणार नाही
-  गेल्या १८ महिन्यांच्या अनुभवावरुन सांगू शकतो, भारताला गरीब राहण्याचा अधिकार नाही 
-  शामजी कृष्ण वर्मांची शेवटची इच्छा डेव्हिड कॅमेरून यांनी पूर्ण केली
-  भारताला जगाकडून उपकार नकोत, बरोबरीचं स्थान हवंय
-  रेल्वेचा खूप जलद गतीने विकास होत आहे, रेल्वेमध्ये १०० टक्के थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) केला आहे
-  भारतात आज स्वच्छता हे एक आंदोलन बनले आहे, देशाला अस्वच्छेतेपासून मुक्त करणे हे माझे स्वप्न
-  आता केवळ विकासाच्या वाटेवरच चालणार आहे
-  
 
>> लंडनमधील वेम्बले स्टेडियममधील ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरूनयांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे 
- केम छो वेम्बले! बोलून भाषणाची सुरूवात गुजराती भाषामधून केली.
- भारतात अच्छे दिन जरूर येणार
- भारताला संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वासाठी ब्रिटनचा पाठिंबा
- ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचा पंतप्रधान होण्याचा दिवस दुर नाही
- भारताच्या गुंतवणूकीमुळे ब्रिटनमध्ये रोजगार उत्पन्न
 
> मोदींच्या भाषणापुर्वी ६०० कलाकारांचा परफॉर्म  
नरेंद्र मोदी यांनी लंडनमध्ये वेंब्ली स्टेडियममध्ये ६०,००० भारतीय समुदायासमोर भाषण केले, भाषण सुरु होण्यापुर्वी जवळपास ६०० भारतीय आणि लंडनमधील कलाकारांनी परफॉर्म सादर केले. मराठमोळ्या ढोल-ताशांपासून ते राजस्थानी नृत्याचीही झलक पाहायला मिळाली. विशेष म्हणजे यावेळी भारत आणि इंग्लंडच्या संस्कृतीचा मिलाफ असणाऱ्या काही परफॉर्मन्सनी उपस्थितांची मनं जिंकून घेतली. यामध्ये मराठमोळ्या गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये आई अंबेचा उदो उदो आणि गणपती बप्पा मोरया या गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आले. यावेळी स्टेडियममधील वातावरण भक्तिमय झाले होते.
> पंतप्रधान नरेंद्र मोदीं - राणी एलिझाबेथ भेट 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राणी एलिझाबेथ द्वितीय यांची भेट घेतली, स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता राणी सोबत बंकिंगहम पॅलेसमध्ये शाही भोजनाचा अस्वाद घेतला. राणी एलिझाबेथ द्वितीय यांना मोदी यांनी ५४ वर्षापुर्वीच्या त्यांच्या भारत दैऱ्यातील काही निवडक छायाचित्रे भेट म्हणून दिली.