शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:55 IST

BrahMos Missile Scientist Death: ब्रह्मोस मिसाईल प्रोजेक्टचे रशियन शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे ७४ व्या वर्षी निधन झाले. झिरकॉन हायपरसोनिक क्षेपणास्त्राचे डिझायनर आणि भारत-रशिया मैत्रीचे प्रतीक असलेल्या या महान शास्त्रज्ञाची कारकीर्द जाणून घ्या.

ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची नांगी ठेचणाऱ्या आणि भारताची शान असलेल्या 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्र प्रकल्पाचे महत्त्वाचे शिल्पकार आणि रशियाचे दिग्गज क्षेपणास्त्र डिझायनर अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे ५ एप्रिल रोजी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. लिओनोव्ह यांच्या निधनाने जागतिक संरक्षण क्षेत्रात, विशेषतः भारत आणि रशियाच्या संयुक्त संरक्षण प्रकल्पांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

ब्रह्मोस आणि लिओनोव्ह यांचे नातेअलेक्झांडर लिओनोव्ह हे रशियाच्या प्रसिद्ध 'NPO माशिनोस्ट्रोएनिया' (NPOMASH) या एयरोस्पेस कंपनीचे सीईओ आणि मुख्य डिझायनर होते. ही कंपनी भारताच्या डीआरडीओसोबत 'ब्रह्मोस एरोस्पेस'मध्ये मुख्य भागीदार आहे. जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'ब्रह्मोस'च्या विकास प्रवासात लिओनोव्ह यांचा मोलाचा वाटा होता.

'झिरकॉन' हायपरसोनिक क्षेपणास्त्राचे जनकलिओनोव्ह केवळ ब्रह्मोसपुरते मर्यादित नव्हते. रशियाच्या ताफ्यातील 'झिरकॉन' या महाविनाशक हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे डिझाइन करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. याशिवाय त्यांनी ग्रेनिट, वल्कन आणि बास्टियन यांसारख्या प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली आणि कोस्टल डिफेन्स सिस्टमच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ब्रह्मोस: जगातील सर्वात वेगवान अस्त्रभारत आणि रशियाच्या मैत्रीचे प्रतीक असलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्र आज जगातील सर्वात घातक क्षेपणास्त्रांपैकी एक मानले जाते. 'ऑपरेशन सिंदूर'मध्येही या क्षेपणास्त्राचा प्रभावी वापर करण्यात आला होता. लिओनोव्ह यांनी दिलेल्या तांत्रिक योगदानामुळेच आज भारत संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. त्यांच्या निधनाबद्दल भारतीय संरक्षण वर्तुळातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BrahMos Missile Pioneer Alexander Leonov Passes Away, India Mourns Loss

Web Summary : Alexander Leonov, key BrahMos missile project architect and Russian designer, died April 5th at 74. He co-created the BrahMos missile and Zircon hypersonic missile. His work propelled India toward defense self-reliance.
टॅग्स :russiaरशियाIndian Armyभारतीय जवानDRDOडीआरडीओOperation Sindoorऑपरेशन सिंदूर