शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्या महिनाभर खरेदीएवढे तेल युरोप रोज घेतो', रशियाकडून तेल खरेदीबाबत भारताने अमेरिकेला अमेरिकेतच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 08:51 IST

अमेरिकेसाेबत द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर जाेर देतानाच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावर अमेरिकेला अमेरिकेमध्येच खडे बाेल सुनावले.

वाॅशिंग्टन :

अमेरिकेसाेबत द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर जाेर देतानाच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावर अमेरिकेला अमेरिकेमध्येच खडे बाेल सुनावले. भारताच्या तेल खरेदीऐवजी तुम्ही युराेपकडे लक्ष देण्याचा सल्ला जयशंकर यांनी अमेरिकेला दिला. 

भारत आणि अमेरिकेत वाॅशिंग्टनमध्ये २ विरुद्ध २ मंत्री पातळीवरील चर्चा झाली. त्यात एस. जयशंकर यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताचे, तर परराष्ट्रमंत्री एंटाेनी ब्लिंकन आणि संरक्षण मंत्री लाॅयड ऑस्टीन यांनी अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले. ब्लिंकन यांनी चर्चेदरम्यान रशियाकडून तेल खरेदीचा मुद्दा मांडला. 

अमेरिकेने यापूर्वीही भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढवू नये, याबाबत भूमिका घेतली हाेती. त्यावर जयशंकर यांनी त्यांना जाेरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की तुम्ही रशियाकडून ऊर्जा खरेदीबद्दल बाेलत आहात. 

मी तुम्हाला सल्ला देईन, की तुम्ही युराेपकडे लक्ष द्या. आमच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आवश्यक तेवढी ऊर्जा खरेदी आम्ही करताे. मात्र, आकडेवारी पाहिल्यास महिनाभरात जेवढे कच्चे तेल रशियाकडून भारत खरेदी करताे, त्यापेक्षा जास्त खरेदी युराेपमध्ये एका दिवसात हाेते, हे लक्षात येईल. व्हाईट हाउसच्या माध्यम सचिव जेन साकी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की भारत १ ते २ टक्के तेल रशियाकडून विकत घेताे. त्या तुलनेत भारत अमेरिकेकडून १० टक्के तेलाची आयात करताे. 

भारत आणि रशियामधील संबंध अनेक दशकांपासून आहेत. अमेरिका भारताचा भागीदार बनण्यास सक्षम नव्हता, अशावेळी हे संबंध विकसित झाले, ही बाब एंटाेनी ब्लिंकन यांनी मान्य केली. 

युक्रेनबाबत भूमिका भारतालाच ठरवावी लागणारभारताने युक्रेनबाबत मांडलेली भूमिका आणि अतिशय महत्त्वपूर्ण मानवीय मदत केल्याबाबत एंटाेनी ब्लिंकन यांनी समाधान व्यक्त केले. युक्रेनमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या हत्येचा भारताने निषेध करून स्वतंत्र चाैकशीची मागणी केली. तसेच भारताने युक्रेनला औषधांसह इतरही बरीच मानवीय मदत केली आहे. या आव्हानांबाबत काय भूमिका घ्यावी, हे भारतालाच ठरवावे लागणार आहे, असे ब्लिंकन म्हणाले.

 

टॅग्स :IndiaभारतUSअमेरिकाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया