शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या मित्रानं पाकिस्तानसोबत केला अब्जावधी डॉलर्सचा करार? रशियानं केली पाक माध्यमांंच्या दाव्याची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 14:48 IST

पाकिस्तान माध्यमांनी दिलेल्या वृत्तांमध्ये म्हणण्यात आले होते की, दोन्ही देशांदरम्यान २.६ अब्ज डॉलर्सचा करार झाला आहे...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तान पूर्णपणे एकाकी पडला आहे. यातच, भारताचा मित्र असलेल्या रशियाने पाकिस्तानसोबत मोठा करार केल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांतून करण्यात आला होता. मात्र, रशियाने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. एवढेच नाही, तर या अफावा असून आमचे भारतासोबत असलेले संबंध खराब करण्याचा हा प्रयत्न असल्याचे रशियाने म्हटले आहे. 

खरे तर, रशिया आणि पाकिस्तानने कराची येथील सोव्हिएत काळातील एक स्टील प्लांट पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी करार केल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला होता. सोव्हिएत युनियनने १९७० च्या दशकात पाकिस्तान स्टील प्लांटची रचना केली होती आणि त्याला निधी देखील दिला होता. तथापी, आता हा स्टील प्लांट पूर्णपणे भंगार झाला आहे.

पाकिस्तान माध्यमांनी दिलेल्या वृत्तांमध्ये म्हणण्यात आले होते की, दोन्ही देशांदरम्यान २.६ अब्ज डॉलर्सचा करार झाला आहे. तथापि, रशियाने याचे फॅक्ट चेक करून हे खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच, अशा कुठल्याही करारांवर स्वाक्षरी केल्याच्या वृत्ताचे मॉस्कोने खंडन केले आहे.

यासंदर्भात रशियन वृत्तसंस्था स्पुतनिकने स्पष्ट केले आहे की, पाक माध्यमांनी प्रसिद्ध केलेले हे वृत्त अतिशयोक्तीपूर्ण आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तासंदर्भात बोलताना शुक्रवारी एका रशियन अधिकाऱ्याने म्हटले आहे की, 'हे भारतासोबतचे संबंध खराब करण्याची इच्छा असलेल्या कुण्या व्यक्तीने दिलेले अतिशयोक्तिपूर्ण वृत्त आहे. 

रशिया-पाकिस्तान कराराचा कसलाही पुरावा नाही -स्पुतनिक इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 'रशिया आणि पाकिस्तान यांच्यात 2.6 अब्ज डॉलरचा करार झाल्याच्या वृत्तांत विश्वसनीय सूत्रांची कमतरता आहे. रशिया आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा झाली. मात्र त्यांच्याकडे अब्जावधी डॉलर्सचा करार झाल्याचा कसलाही पुरावा नाही.' तसेच, या दाव्यांची सुरुवात निक्केई एशियाने आपल्या वृत्तात केली होती. ज्यावर 2022 पासूनच रशियात बंदी आहे, असेही संबंधित वृत्तात म्हणण्यात आले आहे.

टॅग्स :russiaरशियाPakistan Electionsपाकिस्तान निवडणूकIndiaभारत