शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या दबावापुढे न झुकल्यानं भारताचा दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 06:44 IST

आशियाई देशांमध्ये अस्वस्थता; नेपाळ, पाकिस्तान वगळता एकही देश चीनच्या बाजूनं नाही

नवी दिल्ली: भारत-चीन संघर्षाकडे आशियाई देशांसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया व युरोपीय महासंघाचं लक्ष लागलं आहे. मात्र पाकिस्तान व नेपाळ वगळता एकाही देशानं अद्याप चीनची तळी उचलून धरलेली नाही. किंबहुना चीनच्या दबावापुढे न झुकल्यानं भारताचा दबदबा वाढला आहे.कालापानी सीमेवरून नेपाळनं आपली भूमिका भारतविरोधीच ठेवली. गलवान खोऱ्यात भारत-चिनी सैनिकांच्या झटापटीवर नेपाळनं दोन दिवस प्रतिक्रिया देण्याचं टाळलं असलं तरी गुरुवारी भारतीय हद्दीतील तीन भूभागांचा नकाशात समावेश करणारे विधेयक नेपाळी संसदेनं संमत केलं. त्यामुळे नेपाळ चीनच्या इशाऱ्यावर भारतविरोध कायम ठेवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ जून रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधला होता. तेव्हा चीनच्या सीमेवरील कुरापतींविषयी चर्चा केली होती. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी उघडपणे चीनची बाजू घेणं स्वाभाविकच म्हणायला हवं. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमधून मिळणाऱ्या निधीची गरज असल्यानंच पाकिस्ताननं चीनधार्जिणी भूमिका घेतली. पाकिस्तान व नेपाळ या दोन्ही देशांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे चीनची तळी उचलून धरली आहे. श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, भूतान, इंडोनेशिया या देशांनी अद्याप थेट प्रतिक्रिया न देता 'वेट ऍण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे. युरोप महासंघाचे प्रवक्ते वी. हेनरिक्सन म्हणाले, आशिया खंडात शांतता राहावी यासाठी दोन्ही देशांन चर्चेतून हा प्रश्न सोडवावा.

ऑस्ट्रेलियानं चीनला खडसावलंऑस्ट्रेलियाचे भारतातील राजदूत बरी ओ फ्रायल यांनी दक्षिण चीन सागरावरून चीनला खडसावलं. भारत व ऑस्ट्रेलियासाठी कुणी तिसरा नियम बनवू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी चीनचं नाव न घेता टीका केली. भारताचे ऑस्ट्रेलिया, अमेरिकाव आशिया खंडातील सर्वच देशांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष आहे. नेपाळ व पाकिस्तानचा अपवाद वगळता चीनच्या बाजूनं एकाही देशानं भूमिका घेतलेली नाही. अमेरिकेनं मात्र आम्ही भारत-चीनमधील संघर्षाकडे लक्ष ठेवून असल्याचं म्हटलं होतं.  

टॅग्स :chinaचीन