अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा सत्तेत आल्यापासून तिथे राहणाऱ्या इतर देशातील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. आधी अमेरिकेत व्हिसाचे नियम कडक करण्यात आले, तर दुसरीकडे, आता तिथे राहणाऱ्या भारतीयांना हद्दपारीची नोटीस देण्यात येत आहे. या सूचनेनुसार, त्यांना शक्य तितक्या लवकर अमेरिका सोडण्यास सांगण्यात आले आहे. तर नियमांनुसार, त्यांच्याकडे ६० दिवसांचा वेळ आहे.
अमेरिकेत काम करणाऱ्या एच-१बी व्हिसा धारकांसाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे. एका तपासणीत असे दिसून आले आहे की, सहापैकी एक एच-१बी व्हिसा धारक किंवा त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला नोकरी गमावल्यानंतर ६० दिवसांच्या मुदतीपूर्वीच हद्दपारीची नोटीस मिळत आहे. नोटीस मिळाल्यानंतर, लोक म्हणतात की त्यांच्याकडे भारतात परतण्याशिवाय पर्याय नाही.
अमेरिकन प्रशासनाच्या या प्रकारच्या सूचनेमुळे तिथे राहणाऱ्या लोकांना सतत याचीच चिंता वाटत आहे. कारण नोकरी गेल्यानंतर लोकांचे पगार कमी झाले आहेत आणि त्यांची जीवनशैलीही खूप बदलली आहे. त्यामुळेच सर्वांची चिंता वाढली आहे.
नोकरी शोधण्यासाठी वेळच नाही!अमेरिकेत कामावरून काढून टाकलेल्या 'एच १बी' कामगारांना नवीन काम शोधण्यासाठी किंवा त्यांचा व्हिसा दर्जा बदलण्यासाठी ६० दिवसांचा वाढीव कालावधी दिला जातो. परंतु, २०२५च्या मध्यापासून, वाढीव कालावधी संपण्यापूर्वी एनटीए जारी केल्याच्या बातम्या येत आहेत. अशी अनेक प्रकरणे आहेत, जिथे एनटीए दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळेत पाठवले गेले आहेत. नियमानुसार ६० दिवसांचा वाढीव कालावधी अनिवार्य असला तरी, अधिकारी इच्छित असल्यास हा ६० दिवसांचा कालावधी आणखी वाढवू शकतात. हे सर्व अधिकाऱ्यांच्या हातात आहे.
४५ टक्के भारतीयांनी नोकऱ्या गमावल्याअनेक भारतीय एच-१बी व्हिसावर अमेरिकेत काम करत आहेत. मात्र, जे लोक आयुष्यभर तिथे स्थायिक होण्याची योजना आखत होते ते आता त्यांच्या योजना बदलत आहेत. एका सर्वेक्षणानुसार, अनेक लोक भारतात परत येऊ इच्छितात. कारण तिथे राहणाऱ्या ४५ टक्के भारतीयांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. यामुळे २६ टक्के लोक नोकरीसाठी इतर देशांमध्ये गेले आहेत. उर्वरित लोक आता भारतात परतण्याचा विचार करत आहेत. कारण वेळेपूर्वी मिळालेल्या नोटिसांमुळे त्यांना समस्या येत आहेत.
पुन्हा अमेरिकेत काम करायचे नाही, असे अनेकांचे मत बनले आहे. पण अजूनही बरेच लोक तिथे काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. लोकांना वाटत आहे की, जर त्यांनी अमेरिका सोडली तर त्यांचे पगार मोठ्या प्रमाणात कमी होतील. यामुळे सामाजिक जीवनावरही परिणाम होईल आणि नवीन नोकरीच्या संधीही कमी होतील. यामुळेच ते अमेरिकेत टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहेत.