शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

स्विस बँकांकडे भारतीयांची पाठ? बँकांमधील भारतीयांची 'माया' आटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 08:13 IST

भारतीय नागरिकांकडून जमा होणाऱ्या रकमेत 6 टक्क्यांनी घट

नवी दिल्ली: भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांकडून स्विस बँकांमध्ये जमा करण्यात येणाऱ्या पैशात घट झाली आहे. 2018 मध्ये भारतीयांनी स्विस बँकांमध्ये जमा केलेल्या रकमेत 6 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. स्विस बँकांमध्ये भारतीयांनी जमा केलेली रक्कम सध्या 95.5 कोटी स्विस फ्रँक (6,757 कोटी रुपये) इतकी आहे. स्विस नॅशनल बँकेनं (एसएनबी) ही आकडेवारी जाहीर केली. भारतीयांसोबतच जगभरातील अनेक देशांमधील नागरिकांकडून स्विस बँकांमध्ये जमा होणाऱ्या रकमेत घट झाली आहे. जगभरातून स्विस बँकांमध्ये जमा झालेल्या रकमेचं एकूण मूल्य 1.40 लाख कोटी स्विस फ्रँक (99 लाख कोटी रुपये) इतकं आहे. झ्युरिचमध्ये असलेल्या स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकिंग प्राधिकरणाकडून दरवर्षी याबद्दलची आकडेवारी जाहीर करण्यात येते. भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांनी जमा केलेली रक्कम विचारात घेऊन आकडेवारी सादर करण्यात आल्याची माहिती एसएनबीनं दिली. स्वित्झर्लंडमधील बँकांच्या अहवालातील अधिकृत माहितीच्या आधारे ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. स्विस बँकांमध्ये जमा असणाऱ्या भारतीयांच्या काळ्या पैशाचा मुद्दा कायम चर्चेत असतो. मात्र स्विस नॅशनल बँकेनं दिलेल्या माहितीवरुन नेमका आकडा स्पष्ट झालेला नाही. भारतीयांनी आणि अनिवासी भारतीयांनी इतर देशांच्या चलनांच्या स्वरुपात जमा केलेल्या पैशाचा समावेश स्विस नॅशनल बँकेनं दिलेल्या आकडेवारीत नाही. भारतीय नागरिकांनी स्विस बँकांमध्ये जमा केलेल्या पैशात 2017 मध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र त्यानंतर यामध्ये घट झाली.  

टॅग्स :black moneyब्लॅक मनीSwiss Bankस्विस बँक