शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त राष्ट्रातील अधिकारी रवी करकरा यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप; आठ पुरुषांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 12:37 IST

रवी करकरा हे 'यूएन वूमन'मध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अँड अॅडवोकसी टू द असिस्टंट सेक्रेटरी जनरल यांचे आणि याच विभागाचे डेप्युटी डायरेक्टर यांचे वरिष्ठ सल्लागार आहेत.

न्यू यॉर्क- संयुक्त राष्ट्राच्या लैंगिक समानता आणि महिला सबलीकरणासाठी काम करणाऱ्या ('यूएन वूमन') विभागातील भारतीय अधिकारी रवी करकरा यांच्यावर लैंगिक छळ केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. आठ पुरुषांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. रवी करकरा हे 'यूएन वूमन'मध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अँड अॅडवोकसी टू द असिस्टंट सेक्रेटरी जनरल यांचे आणि याच विभागाचे डेप्युटी डायरेक्टर यांचे वरिष्ठ सल्लागार आहेत. रवी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन आपल्यावर लैंगिक अत्याचार केले असा 8 पुरुषांनी आरोप केला आहे. याबाबत न्यूजवीकने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

या आरोपानंतर तपास सुरु करण्यात आला असून यूएन वूमनने विभागातर्फे निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात, या संदर्भातील तपास वेगाने करण्यात येऊन त्यातून योग्य निष्कर्ष काढण्यात येईल. तसेच या तपासाला प्राधान्य देऊन अत्यंत सखोल चौकशी करण्यात येईल असेही म्हटले आहे. यूएन वूमनच्या निवदेनामध्ये करकरा यांचे नाव लिहिले नसून तेथे संबंधित कर्मचारी असा उल्लेख करण्यात आला आहे तर यूएनच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनामध्ये करकरा यांचे नाव घेण्यात आले आहे. याबाबत करकरा यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही.न्यूजवीकच्या माहितीनुसार स्टीव्ह ली या 25 वर्षांच्या पॉलिसी अॅक्टिविस्टने करकरा यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत.

करकरा यांनी युनीसेफ, यूएन वूमन तसेच सेव्ह द चिल्ड्रेनसाठी याआधी काम केले आहे. यूएन हॅबिटॅटमध्येही ते सल्लागार म्हणून काम पाहातात. वर्ल्ड वी वॉन्ट 2015 या योजनेचे ते सहअध्यक्ष होते.

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारत