शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भारताने डोकलाममधून सैन्य मागे घेतले, आमचे सैनिक गस्त घालणारच - चीनचा अडेलतट्टूपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 14:57 IST

भारताने वादग्रस्त डोकलाम भागातून आपले सैन्य मागे घेतले असल्याचा दावा चीनने केला असून आपले सैनिक मात्र या भागात गस्त घालणारच असे म्हटले आहे.

ठळक मुद्देदोन्ही देशांचे सैन्य या भागातून मागे घेण्यात येत असल्याचे भारताने जाहीर केलेकाही तासांमध्येच चीनने भारताने माघार घेतल्याचा दावा केला आहे

नवी दिल्ली, दि. 28 - भारताने वादग्रस्त डोकलाम भागातून आपले सैन्य मागे घेतले असल्याचा दावा चीनने केला असून आपले सैनिक मात्र या भागात गस्त घालणारच असे म्हटले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही देशांचे सैन्य या भागातून मागे घेण्यात येत असल्याचे भारताने जाहीर केल्यानंतर काही तासांमध्येच चीनने भारताने माघार घेतल्याचा दावा केला आहे, असे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.भारताच्या सिक्कीम सीमेजवळ भूताननजीकच्या डोकलाम भागामध्ये दोन महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी भारत व चीनमध्ये तमाव सदृष स्थिती आहे. या भागात चीन रस्ते बांधत असून ते भारतासाठी धोक्याचे असल्याचे भारताने म्हटले तर, चीन आपल्या स्वायत्ततेत्या बाबतीत कुठलीही तडजोड करणार नाही असं सांगत चीनने आक्रमक भूमिका कायम ठेवली.यामुळे दोन्ही देशांचे सैन्य समोरा समोर ठाकले आणि 1962 नंतर प्रथमच एवढी तणावाची वेळ दोन्ही देशांदरम्यान आली. मात्र, सोमवारी भारतीय परराष्ट्र खात्याने तणाव निवळत असल्याचे व दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यात येत असल्याचे सांगत चांगली बातमी दिली.  या वृत्तास चिनी ग्लोबल टीव्ही नोटवर्कनेही दुजोरा दिला. मात्र, आता त्यानंतर आलेल्या चीनच्या या पवित्र्यानंतर तणाव निवळल्याच्या वृत्ताबाबतच संशय निर्माण झाला आहे.चिनी परराष्ट्र खात्याने डोकलाम भागातून भारतीय सैन्य हटल्याचे सांगत त्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि चिनी सैन्य मात्र या भागात गस्त घालत राहील असेही नमूद केले. एएफपी वरॉयटर्स या दोन्ही वृत्तसंस्थांनी हे वृत्त दिले आहे.

 

टॅग्स :chinaचीनborder disputeसीमा वाद