बँकॉक, पटायाला मौजमजेसाठी जगभरातून लाखो पर्यटक जातात. भारतीयांचाही त्यात मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. थायलंडच्या पटाया शहरात तीन भारतीय पर्यटकांनी लाजिरवाने कृत्य केले आहे. यामुळे भारतीय पर्यटकांचे नाव खराब झाले आहे.
पटाया मेलने याचे वृत्त दिले आहे. यानुसार तीन भारतीय पर्यटकांनी बार गर्लला पैसे देऊन हॉटेलच्या रुममध्ये बोलविले होते. परंतू ती येताच तिच्या शरीराची बांधणी पाहून हे मौजमजेसाठी गेलेले वासनांध पर्यटक नाराज झाले. या बारगर्लची छाती खूपच छोटी असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आणि ती जात नसल्याने थायलंडच्या पोलिसांना बोलविले.
१८ जुलैच्या रात्रीचा हा प्रकार असून आता तो बाहेर आला आहे. भारतीय पर्यटकांनी थायलंडच्या पोलिसांना अर्ध्या रात्री फोन करून बोलवून घेतले होते. पटायाच्या सायो बीच ११ भागातील हा प्रकार आहे. पोलिस जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना ती बारगर्ल घाबरलेल्या अवस्थेत दिसली. तिने असे काय केलेय की या लोकांनी पोलिसांना बोलावले, असे तिला वाटत होते.
ही बारगर्ल ३५ वर्षांची होती. तिने दिलेल्या तक्रारीनुसार या तीन भारतीय पर्यटकांनी तिला एका रात्रीसाठी बोलावले होते. ३००० बाट म्हणजेच ७००० भारतीय रुपयांना सौदा पक्का केला होता. त्यांनी त्यापैकी १००० वाट आगाऊ दिले होते. यानंतर ती त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये आली होती. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी तिच्या शरीराबद्दल वाईट टिप्पणी करण्यास सुरुवात केली, तिची छाती खूपच छोटी असून त्यांना हवी तशी ती नाहीय, असे ते म्हणू लागले. तिला वाद नको होता, म्हणून ती पैसे परत करून जाणार होती. तेवढ्यात या तरुणांनी ती पैसे उकळणार असे सांगून पोलिसांना बोलविले होते.
पोलिसांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकले आणि सामंजस्याने वाद मिटविण्यास सांगितले. तसेच कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला. यानंतर तरुणांनी तिला काही पैसे देण्याचे मान्य करत प्रकरण संपविले.