शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वंशाचे झोहरान ममदानी यांनी दोनदा घेतली न्यूयॉर्क महापौरपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 09:54 IST

‘त्या’ पदावर विराजमान होणारे पहिले दक्षिण आशियाई...

न्यूयॉर्क : भारतीय वंशाचे झोहरान ममदानी (वय ३४) यांनी नवीन वर्ष सुरू होताच काही क्षणांतच येथे एका जुन्या व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मेट्रो स्थानकात आयोजित खासगी समारंभात न्यूयॉर्क शहराचे ११२वे महापौर म्हणून गुरुवारी शपथ घेतली. ते या शहराचे पहिले दक्षिण आशियाई व पहिले मुस्लिमधर्मीय महापौर ठरले आहेत. 

ममदानी यांचे गुरुवारी दोन शपथविधी झाले. त्यापैकी पहिला शपथविधी एका खासगी समारंभात जुन्या सिटी हॉल मेट्रो स्थानकात पार पडला. त्याप्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि जवळची मित्रमंडळी उपस्थित होती. त्यानंतर गुरुवारी दुपारी न्यूयॉर्क शहर प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या सिटी हॉलबाहेर ममदानी यांचा औपचारिक शपथविधी समारंभ पार पडला. व्हरमाँटचे सिनेटर बर्नी सँडर्स नव्या महापौरांना पदाची शपथ देतील.

भारतीय वंशाचे ममदानी हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर आणि कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक महमूद ममदानी यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म आणि संगोपन युगांडातील कंपाला येथे झाले. वयाच्या सातव्या वर्षी ते आपल्या कुटुंबासह न्यूयॉर्क शहरात आले. ममदानी यांनी नुकतेच २०१८मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.   

बलाढ्य उमेदवारांवर मिळविला विजयगेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत झोहरान ममदानी यांनी विजय मिळविला होता. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कर्टिस स्लिवा आणि राजकीयदृष्ट्या वजनदार व्यक्तिमत्व व न्यूयॉर्क राज्याचे माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांचा पराभव केला. दरम्यान, शपथविधीसाठी जुन्या मेट्रो स्थानकाची निवड का केली, याबाबत ममदानी यांनी सांगितले की, १९०४मध्ये सुरू झालेले ओल्ड सिटी हॉल स्टेशन न्यूयॉर्कच्या २८ मूळ मेट्रो स्थानकांपैकी एक आहे. त्या शहरात कामगारांचे जीवन उत्तम व्हावे, यासाठी जे प्रयत्न झाले त्याचे हे मेट्रो स्टेशन साक्षीदार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian-origin Zohran Mamdani Twice Sworn in as New York Mayor

Web Summary : Zohran Mamdani, of Indian descent, became New York City's 112th mayor in a private ceremony. He is the first South Asian and Muslim mayor. Mamdani, son of Mira Nair, won against Curtis Sliwa and Andrew Cuomo. He chose the historic City Hall station for its labor history.
टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाMayorमहापौर