शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वंशाच्या रवी भल्ला यांची होबोकेनच्या महापौरपदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 15:17 IST

अमेरिकेतील होबोकेन शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाचे रवी भल्ला यांची निवड झाली आहे. महापौरपदाच्या शर्यतीत सहा उमेदवार होते. मात्र सर्वांना मागे टाकत भल्ला यांनी बाजी मारली आहे. प्रचाराच्या कालावधीमध्ये वाटण्यात आलेल्या काही पत्रकांमध्ये भल्ला यांना दहशतवादी असे पत्रके वाटून संबोधण्यात आले होते. 

ठळक मुद्देमागच्या आठवड्यात भल्ला यांच्या फोटोवर 'तुमच्या शहरावर दहशतवादाचा ताबा येऊ देऊ नका'! असे छापलेली पत्रके शहरातील सर्व गाड्यांवर लावण्यात आली होती. ही पत्रके महापौरपदाच्या शर्यतीतील दुसरे उमेदवार माईक डिफ्युस्कोज यांच्या नावाने काढण्यात आली होती.परंतु माईक यांनी त्यामध्ये आपला सहभाग नसल्याचे स्पष्ट केले होते.

न्यू यॉर्क- अमेरिकेतील होबोकेन शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाचे रवी भल्ला यांची निवड झाली आहे. महापौरपदाच्या शर्यतीत सहा उमेदवार होते. मात्र सर्वांना मागे टाकत भल्ला यांनी बाजी मारली आहे. प्रचाराच्या कालावधीमध्ये अज्ञात लोकांनी वाटलेल्या पत्रकांमध्ये भल्ला यांना दहशतवादी असे पत्रके वाटून संबोधण्यात आले होते. 

भल्ला यांची महापौरपदी निवड झाल्याचे सध्याच्या महापौर डॉन झिमर यांनी जाहीर केले. झिमर यांनी आपण तिसऱ्यांदा महापौर बनण्यासाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर या निवडणुकीत भल्ला यांनी उतरण्याचे निश्चित केले आणि त्यांना विजयही मिळाला.निवडून आल्यानंतर भल्ला यांनी आनंदाने पण अत्यंत संयमासह नम्रपणे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'माझ्यावर, माझ्या समुदायावर, आपल्या राज्यावर, आपल्या देशावर विश्वास ठेवल्याबद्दल मी आपला आभारी आहे. हेच अमेरिकेचे मूळतत्व आहे. प्रचाराचा काळ अत्यंत खडतर होता पण आता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 

मागच्या आठवड्यात भल्ला यांच्या फोटोवर 'तुमच्या शहरावर दहशतवादाचा ताबा येऊ देऊ नका'! असे छापलेली पत्रके शहरातील सर्व गाड्यांवर लावण्यात आली होती. ही पत्रके महापौरपदाच्या शर्यतीतील दुसरे उमेदवार माईक डिफ्युस्कोज यांच्या नावाने काढण्यात आली असली तरी माईक यांनी यामध्ये आपला सहभाग नव्हता असे स्पष्टीकरण दिले होते. भल्ला यांच्या विजयानंतर माईक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, 'शहराचे पहिले  लैंगिकता प्रकट करणारे पहिले गे महापौर (ओपनली गे) होण्यापासून आपण थोडक्यात हुकलो. सर्वबाजूंनी प्रखर टीका होत असूनहीआम्ही गेली 9 वर्षे प्रशासन चालवणाऱ्यांविरोधातील आमचे आव्हान कायम ठेवले, भल्ला यांच्याविरोधात अत्यंत कमी फरकाने पराभूत झालो आहोत. भल्ला यांना सर्वसहमतीने काम करावे लागेल.'

टॅग्स :USअमेरिका