शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाची बातच न्यारी; नासाचं 'मिशन मंगळ' 1 BHKमधून करताहेत कंट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 09:03 IST

काम थांबू नये, कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून भाड्यानं घेतला वन बीएचके फ्लॅट; नासासाठी शास्त्रज्ञ करतोय वर्क फ्रॉम होम

लंडन: अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासानं (NASA) काही दिवसांपूर्वीच रोबो पर्सिव्हिएरन्स रोवरला (Perseverance Rover) यशस्वीरित्या मंगळ ग्रहावर उतरवलं. आता हा रोबो मंगळ ग्रहावरील महत्त्वाची माहिती नासाला देईल. या मोहिमेवर नासाचे शेकडो शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत घेत आहेत. यापैकी एका भारतीय शास्त्रज्ञाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. प्राध्यापक संजीव गुप्ता पर्सिव्हिएरन्स रोवरचं काम नासाच्या मुख्यालयात किंवा कार्यालयात बसून नव्हे, तर स्वत:च्या वन बीएचके फ्लॅटमधून करत आहेत. पर्सिव्हिएरन्स रोवरवर नियंत्रणात ठेवण्यासाठी गुप्ता यांनी दक्षिण लंडनमध्ये एक फ्लॅट भाड्यानं घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं हवाई वाहतूक बंद आहे. त्यामुळेच गुप्ता एका फ्लॅटमधून नासाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेवर काम करत आहेत.मंगळावर अंतरिक्षयान उतरतानाचा व्हिडिओ नासाने केला जारीब्रिटनमध्ये राहणारे ५५ वर्षीय संजीव गुप्ता यांचं मूळ भारतात आहे. ते भूवैज्ञानिक आहेत. लंडनच्या इम्पिरियल महाविद्यालयात ते भूविज्ञान तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. नासानं मंगळ ग्रहाची माहिती गोळा करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी मोहीम आखली आहे. २०२७ पर्यंत मंगळ ग्रहाची इत्यंभूत माहिती गोळा करून संशोधन करण्याचं काम नासातल्या शास्त्रज्ञांचं एक पथक करत आहे. याच पथकात गुप्ता यांचा समावेश आहे. मंगळावर जीवन आहे की नाही, याचा शोध या पथकाकडून घेतला जात आहे. पहिल्यांदाच! मंगळ ग्रहावरून NASA च्या रोवरने पाठवला पहिला व्हिडीओ, बघा लाल ग्रहाचा अद्भूत नजारा...नासाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेवर काम करताना कॅलिफॉर्नियातल्या जेट प्रोपल्शन लॅबमध्ये उपस्थित राहण्याची गुप्ता यांची इच्छा होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे बंद असणारी हवाई वाहतूक यामुळे गुप्ता यांना कॅलिफॉर्नियाला जाता आलं नाही. मात्र तरीही त्यांचं काम थांबलेलं नाही. काम अविरतपणे सुरू राहावं आणि त्याचा कुटुंबाला त्रास होऊ नये यासाठी त्यांनी दक्षिण लंडनमध्ये एका सलूनच्या वर वन बीएचके फ्लॅट भाड्यानं घेतला आहे. याच फ्लॅटमधून ते पर्सिव्हिएरन्स रोवरच्या मोहिमेवर काम करत आहेत. या मोहिमेत सहभागी ४०० हून अधिक शास्त्रज्ञांचा सहभाग आहे. सध्या वाहतुकीवर निर्बंध असल्यानं यातले अनेक शास्त्रज्ञ घरातूनच काम करत आहेत. 

टॅग्स :NASAनासाMarsमंगळ ग्रह