शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वंशाच्या प्रीती पटेल बनल्या ब्रिटनच्या गृहमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 09:32 IST

ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळामध्ये भारतीय वंशाच्या महिला खासदार प्रीती पटेल यांची गृहमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लंडन - ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळामध्ये भारतीय वंशाच्या महिला खासदार प्रीती पटेल यांची गृहमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री बनणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्या नागरिक ठरल्या आहेत. ब्रिटनमधील हुजूर पक्षाच्या नेतृत्वासाठी  चालवण्यात आलेल्या 'बॅक बोरिस' अभियानातील प्रीती पटेल या प्रमुख सदस्य होत्या. त्यामुळे नव्या कॅबिनेटमध्ये त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.  दरम्यान, नव्या कार्यभाराविषयी घोषणा होण्यापूर्वी प्रीती पटेल म्हणाल्या होत्या की, 'नव्या मंत्रिमंडळात आधुनिक ब्रिटन आणि आधुनिक हुजूर पक्षाचे प्रतिबिंब दिसले पाहिजे.' मूळच्या गुजराती असलेल्या प्रीती पटेल भारतीय वंशाच्या लोकांच्या सर्व मुख्य कार्यक्रमांमध्ये अतिथी म्हणून उपस्थित असतात. तसेच ब्रिटनमध्ये त्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशंसक म्हणून ओळखले जाते. प्रीती पटेल यांचे आई-वडील गुजराती होते. आफ्रिका खंडातील युगांडा येथे वास्तव्यास असलेले त्यांचे आई-वडील 60 च्या दशकात इंग्लंडमध्ये गेले होते. 47 वर्षीय प्रीती पटेल सर्वप्रथम 2010 मध्ये विटहॅम मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2015 आणि 2017 मध्येही त्यांनी या मतदारसंघामधून विजय मिळवला होता. याआधी प्रीती पटेल यांनी डेव्हिड कॅमेरून यांच्या सरकारमध्ये रोजगार राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.  दरम्यान, दोन वर्षांपूर्वी प्रीती पटेल यांना एका वादामुळे टेरिजा मे सरकारमधून राजीनामा द्यावा लागला होता. नोव्हेंबर 2017 मध्ये प्रीती यांनी इस्राइलच्या अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठकीबाबत राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.  

टॅग्स :Englandइंग्लंडIndiaभारतPoliticsराजकारण