शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

दुबईत भारतीय वंशाच्या शेफनं ट्विटमधून हिंदू दहशतवादावर घेतला आक्षेप, सोशल मीडियावर झाले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 19:57 IST

दुबईतल्या एका प्रसिद्ध भारतीय रेस्टारंटच्या मुख्य शेफनं इस्लामविरोधी ट्विट केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

युएई- दुबईतल्या एका प्रसिद्ध भारतीय रेस्टारंटच्या मुख्य शेफनं इस्लामविरोधी ट्विट केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. जेडब्ल्यू मेरियट मार्किस हॉटेलचे शेफ अतुल कोचर यांनी क्वांटिको मालिकेच्या एका भागावरून अभिनेत्री प्रियंका चोप्रावर निशाणा साधला आहे. या भागात हिंदू राष्ट्रभक्तांना दहशतवादी संबोधण्यात आलं आहे.कोचर ट्विटमध्ये लिहितात, हे फारच दुखदायक आहे. गेल्या 2000 वर्षांपासून इस्लाममधून दहशतवादी निर्माण होत असताना हिंदूंना दहशतवादी संबोधून त्यांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. कोचर यांच्या ट्विटवर नेटकरी अक्षरशः तुटून पडले. त्यानंतर ते ट्विट डिलीट करत कोचर यांनी माफीसुद्धा मागितली.कोचर म्हणाले, माझ्या टि्वटची मला कोणतंही स्पष्टीकरण द्यायचं नाही. मी माझी चूक कबूल करतो. इस्लामची सुरुवात 1400 वर्षांपूर्वी झाली आहे. त्यामुळे मी मनापासून माफी मागतो. मी इस्लामविरोधी नाही. मला माझ्या विधानांवर खेद आहे. जेडब्‍ल्यू मेरियट हॉटेलनं शेफच्या विधानांपासून हात झटकले आहेत. हॉटेलकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. शेफ अतुल कोचर यांच्या विधानांची आम्हाला माहिती आहे. परंतु आम्ही त्यांच्या विधानांचं समर्थन करत नाही. आमचं हॉटेल सर्वसमावेशक असून, विविध संस्कृतीच्या प्रतीकाचा हॉटेलला गर्व आहे. शेफच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटक-यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.अनेकांनी शेफला कामावरून काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे. एका यूझर्सनं शेफवर टीका करत म्हटलं आहे की, त्यांचं विधान हे हॉटेलच्या सिद्धांताच्या विरोधात आहे. अशा व्यक्तीला हॉटेलमध्ये कसं काम करू दिलं जाऊ शकतं. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट तात्काळ संपवलं पाहिजे. तर अरब पत्रकारानंही शेफवर टीका केली आहे. कोचर यांनी मला दुखावलं आहे. एक व्यक्ती म्हणून मला भारत आणि तिकडचे लोक आवडतात. एक धर्मनिरपेक्ष आणि उदार व्यक्तीच्या रुपातील एक भयानक विधान आहे.