शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय अभियंत्यांकडून दक्षिण सुदानमध्ये रस्त्यांची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 15:11 IST

संयुक्त राष्ट्राने सुरु केलेल्या प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या रस्ते बांधकाम प्रकल्पाचे काम दक्षिण सुदानमध्ये सुरु झाले आहे. भारतीय अभियंते या कामासाठी मदत करत आहेत.

ठळक मुद्देयुनायटेड नेशन मिशन्सचे दक्षिण सुदानमधील सुरु असणारे प्रयत्न शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त आहेत. या मोहिमेत भारताचे 2400 लोक काम करत आहेत.

जुबा- संयुक्त राष्ट्राने सुरु केलेल्या प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या रस्ते बांधकाम प्रकल्पाचे काम दक्षिण सुदानमध्ये सुरु झाले आहे. भारतीय अभियंते या कामासाठी मदत करत आहेत. या रस्त्यामुळे दक्षिण सुदानमधील दोन शहरे जोडली जाणार आहेत. हा रस्ता 205 किमी लांबीचा आहे.मालकल आणि मेलूत यांच्यामधील रस्त्याची दुरुस्ती आणि बांधकाम झाल्यामुळे मोटरचालक, स्थानिक व्यापारी यांसह संयुक्त राष्ट्राने मदतीसाठी पाठवलेल्या वाहनांना फायदा होणार असल्याचे स्थानिक गव्हर्नर जेम्स टॉर मुनीबनी यांनी या कामाचा शुभारंभ झाल्यावर सांगितले. युनायटेड नेशन मिशन्सचे दक्षिण सुदानमधील सुरु असणारे प्रयत्न शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त आहेत. या मोहिमेत भारताचे 2400 लोक काम करत आहेत.

अमेरिकेचा दक्षिण सुदानला कारवाईचा इशारादक्षिण सुदानमध्ये शांतताप्रक्रीया चालू राहण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधींना परवानगी देऊन सहकार्य करा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करावी लागेल असा इशारा अमेरिकेने दक्षिण सुदानला दिला आहे. अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी निकी हॅले यांनी दक्षिण सुदानला भेट देऊन राष्ट्राध्यक्ष साल्वा कीर यांची राजधानी जुबामध्ये भेट घेतली होती. त्यानंतर सुरक्षा परिषदेत बोलताना 'केवळ आश्वासने चालणार नाहीत' असा इशारा त्यांनी दक्षिण सुदानला दिला आहे.  डोनल्ड ट्रम्प यांच्या सरकारने सप्टेंबर महिन्यातच दक्षिण सुदानच्या काही अधिकाऱ्यांवर आणि माजी लष्करप्रमुखांवर बंधने लादली होती. या अधिकाऱ्यांचा यादवी युद्धात आणि नागरिकांवर हल्ले करण्यात सहभाग होता. अर्थात दक्षिण सुदानवर आता कोणत्याही प्रकारची बंधने संयुक्त राष्ट्रात घालता येणे अमेरिकेला शक्य होणार नाही कारण रशिया त्यांचा नकाराधिकार वापरुन बंधनांचा प्रस्ताव फेटाळू शकते. 2011 साली दक्षिण सुदान हा सुदानपासून वेगळा झाला. मात्र दोनच वर्षांमध्ये या देशात यादवी युद्ध भडकले. या युद्धामुळे एकूण लोकसंख्येच्या एक तृतियांश लोकांना घरे सोडून पळून जावे लागले.

(छायाचित्र- यूएनएमआयएसएस)