शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

भारतीयच तो! फक्त ५ मिनिटांत कोरोनाची 'लिटमस टेस्ट'; संशोधनात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 16:53 IST

Corona Virus Test: रसाय़न शास्त्रात लिटमस पेपरला खूप महत्व आहे. असाच एक पेपर भारतीय शास्त्रज्ञाने विकसित केला आहे.

वॉशिंग्टन : भारतीय वैज्ञानिकाच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या एका टीमने मोठे यश मिळविले आहे. एका कागदाद्वारे कोरोनाची चाचणी करता येणार असून केवळ ५ मिनिटांतच कोरोना पॉझिटीव्ह की निगेटिव्ह आहे, हे समजणार आहे. हा एकप्रकारचा 'लिटमस पेपरच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

रसाय़न शास्त्रात लिटमस पेपरला खूप महत्व आहे. असाच एक पेपर भारतीय शास्त्रज्ञाने विकसित केला आहे. या कागदामध्ये असलेल्या ‘इलेक्ट्रोकेमिकल सेन्सर’चा वापर करणाऱ्या या टेस्टमध्ये केवळ पाच मिनिटांत कोरोना व्हायरसच्या अस्तित्वाची माहिती मिळणार आहे. संशोधकांनुसार ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली तर करोडो लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे. 

अमेरिकेतील इलिनोईस विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी कोरोनाच्या अणुवंशिक कणांच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी एक इलेक्ट्रीकल रीड आऊट सेटअपसोबत ग्राफीन-बेस्ड इलकेबायोसेंसर विकसित केला आहे. ‘एसीएस नैनो’ या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार या बायोसेन्सरमध्ये दोन घटक आहेत. यामध्ये एक ‘इलेक्टोरल रीड-आउट’ मोजण्यासाठी आणि दुसरा व्हायरसच्या आरएनएचा शोध घेण्यासाठी वापरला जातो. 

कसा आहे हा पेपर....या संशोधनासाठी प्रोफेसर दिपंजन पान यांच्या नेतृत्वाखाली टीम काम करत होती. त्यांनी एक प्रवाहीत फिल्म बनविण्यासाठी ग्रॅफिन नॅनोप्लेटलेट्सची एक पातळ पट्टी फिल्टर पेपरवर लावली. यानंतर त्यांनी इलेक्ट्रीकल रीड आऊटसाठी ग्राफीनच्या पट्टीवर एक सोन्याचा इलेक्ट्रोड बसविला. सोने आणि ग्रॅफिनमध्ये मोठ्या प्रमाणावर सेन्सिटिव्हीटी आणि कन्डक्टीव्हीटी असते. याचा फायदा या संशोधनात झाला. हा गुणधर्म विद्युत प्रवाहाच्या संकेतांमध्ये परिवर्तनचा शोध लावण्यासाठी या प्लॅटफॉर्मला अल्ट्रासोनिक बनवितो. या पेपरचा उपयोग केवळ कोरोनाच नाही तर अन्य़ वेगवेगळ्या प्रकारचे आजारांचा शोध लावण्यासाठीही केला जाऊ शकतो, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. 

CoronaVaccine: कोरोना लसीसाठी 'या' अ‍ॅपवर रजिस्टर करावे लागणार

कोरोना व्हायरसची लस लवकरच भारतात दिली जाणार आहे. केंद्राची तातडीने, आपत्कालीन परवानगी मिळविण्यासाठी तीन कंपन्यांनी अर्ज केले आहेत. ब्रिटन, अमेरिका, बहारीन, रशियामध्ये लसीकरणास सुरुवात झाली आहे. यामुळे भारतातही लवकरच लसीकरणाची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. आता ही लस कशी दिली जाणार, कोण कोण लाभार्थी ठरणार, टप्पे, वितरण आदी प्लॅनिंग सुरु असताना अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. अशावेळी सरकारने लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक अ‍ॅप विकसित केले आहे, जे लसीकरणावर नजर ठेवणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या